काउ हग डे’वरून ममता बॅनर्जींचा केंद्रातील सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या, “जर गायीने धडक दिली तर…”

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार टीका केली. ‘काउ हग डे’ च्या वादावर ते म्हणाले की, ते आम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी गायींना मिठी मारण्यास सांगत आहेत, जर गाय आम्हाला तिच्या शिंगांनी मारली तर ? मला ते करायला हरकत नाही, […]

Untitled Design (42)

CM Mamata Banerjee

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार टीका केली. ‘काउ हग डे’ च्या वादावर ते म्हणाले की, ते आम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी गायींना मिठी मारण्यास सांगत आहेत, जर गाय आम्हाला तिच्या शिंगांनी मारली तर ? मला ते करायला हरकत नाही, पण भाजपने (BJP) हे साहस करण्याआधी आम्हाला १० लाखांचा विमा द्यावा. (Cow Hug Day) तसेच गायीला मिठी मारण्यासाठी 20 लाखांचा विमा द्यावा, असा टोला ममता बॅनर्जीं यांनी यावेळी मारला.

केंद्राच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या AWBI ने व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस गोहग दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली. नंतर प्राणी कल्याण मंडळाने (AWBI) हे अपील मागे घेतले.

जेपी नड्डा यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर   

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, भाजपने नोबेल पारितोषिक विजेत्या अमर्त्य सेन यांचा अपमान केला. बंगालमधील हिंसाचार आणि भ्रष्टाचारावर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अलीकडील टिपण्णीबद्दल, सीएम बॅनर्जी यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की त्यांच्या राज्यात देशाच्या इतर भागांपेक्षा कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे.

बीएसएफवर मोठा आरोप

सीमावर्ती भागात बीएसएफने ‘दहशत’ पसरवली असल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात बीएसएफने दहशत पसरवली. सीमाभागात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. या हत्यांचा तपास करण्यासाठी तपास पथके पाठवण्याची तसदी केंद्र सरकार घेत नाही.

भाजपला पराभूत करण्यासाठी हाक

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि अराजकता संपवण्यासाठी देशाने लोकांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Exit mobile version