Download App

Chandrayaanv- 3 नंतर भारतात ‘मून इकोनॉमी’ ची चर्चा; ‘Avatar’ नुसार चालणार कारभार

Chandrayan 3 Launched Moon Economy : हॉलिवूडचा अवतार चित्रपट तुम्हाला आठवतो का? त्या चित्रपटामध्ये दाखल्याप्रमाणे पृथ्वीवरील लोक दुसऱ्या ग्रहावर जातात. तेथील संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. नंतर उघडकीस येत की, ते दुसऱ्या ग्रहावरून आले आहेत. ते तेथील खनिजद्रव्ये पृथ्वीवर पाठवत आहेत. त्यांनी मनुष्यांची वसाहत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे आता ‘चांद्रयान 3’ मोहिमेदरम्यान या चित्रपटाप्रमाणे कारभार चालणारी ‘मून इकॉनॉमी’ चर्चेत आली आहे. ‘चांद्रयान 3’ मोहिमेद्वारे भारत देखील आता ‘मून इकॉनॉमी’चा भाग होणार आहे. मात्र ‘मून इकॉनॉमी’ काय आहे? जाणून घेऊ… ( What is Moon Economy during Chandrayan 3 Launched)

Chandrayan Mission 3 Launched च्या प्रत्येक टप्प्यात काय-काय घडणार? पाहा फोटो…

भारताआधी अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर पोहचण्यात यशस्वी झाले आहेत. तर आता भारताचं चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यास भारत देखील या यादीत समाविष्ट होणारा चौथा देश असेल. त्यामुळे अवतार चित्रपटाप्रमाणे कारभार चालणारी ‘मून इकॉनॉमी’ मध्ये देखील या देशांसह भारतही सहभागी होईल. अवतार चित्रपट होता त्यात सगळ जलद झालं मात्र वास्तवात त्याला दशकांचा वेळ लागेल.

‘मून इकॉनॉमी’ काय आहे?

चंद्रावर अनेक देशांनी अंतराळ यान पाठवले आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रोडक्शन, स्पेस स्टेशन, चंद्रावर मिळणाऱ्या संधाधनांचा वापर करणे, एक्सचेन्ज, डेटा, चंद्र पर्यटन, चंद्रावरील जमीनीचं बुकींग, या सर्व गोष्टी ‘मून इकॉनॉमी’ मध्ये येतात. तर एका अहवालानुसार चंद्रावर मनुष्यांचं अस्तित्वात असणं म्हणजे ‘मून इकॉनॉमी’च असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Chandrayan 3 Launched : भारतासाठी ऐतिहासिक दिवस! अखेर ‘चांद्रयान-3’ झेपावलं…

‘मून इकॉनॉमी’ चे तीन टप्पे आहेत. पहिला चंद्रावर अंतराळ यान पाठवून अभ्यास करणे, मानवाला पाठवणे, पर्यटन उद्योग उभारणे. दुसरा टप्पा चंद्रावरील माहितीची विक्री किंवा तिचा व्यापार करणे. चंद्रावर स्पेस स्टेशन बनवणे, खनिज संसाधानांचा व्यापार करणे. तर तिसऱ्या टप्प्यात चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करणे.

एलन मस्क ते जेफ बेजोस अनेकांनी केला दावा

अनेक देश चंद्रावर माणसांना पाठवण्याची तयारी करत आहेत. तर चांद्रायान 3 देखील त्याचाच भाग आहे. ते यशस्वी झाल्यास भारत देखील चंद्रावर माणसांना पाठवेल. जसं अमेरिकेने 1969 साला केलं. त्यासाठी जेफ बेजोस यांची ‘ब्लू ऑरजिन’ आणि एलन मस्कची ‘स्पेसएक्स’ कंपनी काम करत आहे.

Chandrayaan-3 : याला म्हणतात भारतीय संस्कृती! झोमॅटोने ISRO ला पाठवली खास डिश

एक अहवाल सांगतो की, 2040 पर्यंत 1000 अॅस्ट्रोनोट्स म्हणजे अंतराळवीर चंद्रावर असतील. त्यातील 40 2030 पर्यंतच पोहचतील असा अंदाज आहे. त्यातून चंद्रावर जाण्यासाठी लागणार उपकरणं तसेच स्पेस शटल, टेलीस्कोप, अनेक चंद्रावर आधारीत टीव्ही शो हे सर्वा या मून इकॉनॉमीचा भाग असतील. त्यातून रोजगार निर्मीती होईल. त्यातून 634 अरब डॉलरपर्यंत असेल.

भारत कसा होणार मून इकॉनॉमीचा भाग?

भारताचं चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यास भारत देखील या यादीत समाविष्ट होणारा चौथा देश असेल. त्यामुळे भारताला फर्स्ट मूव्हर होण्याचा फायदा होईल. तर भारताला या मोहिमेसाठी इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च येतो. त्यामुळे मून इकॉनॉमीमध्ये भारताला मोठा भाग मिळेल. तसेच भारत चंद्रावर जाण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीचं केंद्र होऊ शकतं.

Tags

follow us