What is Professional Tax? Which Deduct From Employee Salary : आपल्यापैकी प्रत्येक जण नोकरी करतो त्यासाठी महिन्याकाठी बँक खात्यात पगार जमा केला जातो. खात्यात जमा होणाऱ्या या पगारापोटी प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी स्लिप दिली जाते. मात्र, यात एका गोष्टीचा उल्लेख असतो आणि तो म्हणजे प्रोफेश्नल टॅक्स अर्थात व्यावसायिक कर. पण, हा कर नेमका काय आणि का घेतला जातो. कोती राज्ये हा कर घेतात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
आयकर भरण्याची गरज नाही; भारतात ‘हे’ 10 उत्पन्न पूर्णपणे करमुक्त
प्रोफेश्नल टॅक्सची इन्कम टॅक्स एवढी चर्चा नाही
भारतात, करदात्यांना राज्य आणि केंद्र सरकारसह अनेक पातळ्यांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे विविध कर भरावे लागतात. अप्रत्यक्ष करांमध्ये जीएसटी आणि व्हॅट यांचा समावेश आहे, तर प्रत्यक्ष करांमध्ये आयकर सारख्या नियमांचा समावेश आहे. प्रत्यक्ष करात प्रोफेश्नल टॅक्स, जो देशभरातील राज्य सरकारे आकारतात. जरी त्याची आयकराइतकी व्यापक चर्चा होत नसली तरी, स्वतःच्या प्रोफेशनमधून उत्पन्न कमावतात त्या सर्वांसाठी प्रोफेश्लन टॅक्सला अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रोफेश्नल टॅक्स म्हणजे काय?
प्रोफेश्नल टॅक्स एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स आहे. जो राज्य सरकार प्रोफेशन, ट्रेड किंवा नोकरी करणाऱ्या अथवा कंपन्यांकडून आकारते. साधारतः हा टॅक्स मिळवलेल्या उत्पन्नाच्या टक्केवारीवरून आकारला जातो. नोकरी करणाऱ्यांकडून हा टॅक्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापते तर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना तो थेट राज्य सरकारला भरावा लागतो. What is Professional Tax? Which Deduct From Employee Salary
भारतीय संविधानाच्या कलम 276 अंतर्गत, व्यावसायिक कर दरवर्षी अडीच हजार रूपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. तसेच आयकर कायदा, 1961 अंतर्गत, प्रोफेश्नल टॅक्समध्ये सूटदेखील मिळते. ज्यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न कमी होऊ शकते आणि तुमचे एकूण कर दायित्व कमी होऊ शकते. हा राज्यस्तरीय कर असल्याने, त्याची रचना राज्यानुसार बदलू शकते.
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! आता जास्त स्वाइप केलं तर, धडकणार नोटीस
कुणाला द्यावा लागतो प्रोफेश्नल टॅक्स?
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रोफेशनमधून जर उत्पन्न मिळत असेल तर, त्या व्यक्तीला राज्य सरकार लावत असलेला कर देणे बंधनकारक आहे. या मुख्यतः पगारदार कर्मचारी, डॉक्टर, वकील आणि सल्लागार यांसारख्या प्रोफेशनचा समावेश आहे. पगारदार व्यक्ती मग ती सरकारी आणि खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी असेल या दोघांनाही प्रोफेश्नल टॅक्स भरावा लागतो. तसेच व्यावसायिक डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट इत्यादी व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनाही हा कर भरावा लागतो. याशिवाय अनेक राज्यांमध्ये व्यवसाय करणारी व्यक्ती स्वयंरोजगार करणारी व्यक्ती आणि उद्योजकांनादेखील हा टॅक्स भरावा लागतो. मात्र, विशिष्ट रकमेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना प्रोफेश्नल टॅक्स लागू होत नाही. यात राज्यांनुसार देण्यात येणारी सवलत मर्यादा वेगवगेळीआहे.
प्रोफेश्नल टॅक्स तुमच्या CTC चा भाग आहे का?
पगारदार व्यक्तींसाठी, प्रोफेश्नल टॅक्स हा तुमच्या एकूण पगारातून वजावटीचा भाग आहे. तो तुमच्या सीटीसीचा भाग नसून, तुमच्या कंपनीचा तुम्हाला नोकरी देण्याचा खर्च आहे. पण, क्लिअरटॅक्सनुसार, प्रोफेश्नल टॅक्स हा टेक होम पगारातील वजावट असून, हा टॅक्स दर महिन्याला तुमच्या एकूण पगारावर आधारित मोजला जातो.
SHE Marts : बजेटमध्ये घोषित झालेलं SHE Marts मिशन काय? काय विकता येणार, अर्ज कसा करायचा?
उत्पन्न कर विरुद्ध व्यावसायिक कर
जरी आयकर आणि प्रोफेश्नल टॅक्स हे दोन्ही प्रत्यक्ष कर असले तरी, त्यांच्यात लक्षणीय फरक आहे. केंद्र सरकारकडून एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या आर्थिक वर्षात उत्पन्नावर आयकर आकारते. आयकर दर करदात्याच्या कर स्लॅबवर अवलंबून असतो, जो सरकार ठरवते. हा कर संपूर्ण भारतात लागू आहे आणि विशिष्ट रक्कम कमावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर आकारला जातो. तुम्ही जितके जास्त कमवाल तितका कर दर जास्त असेल आणि कमाल मर्यादा नाही.
याउलट, काही राज्य सरकार नोकरदार व्यक्ती, व्यावसायिक आणि व्यवसाय मालकांच्या एकूण पगारावर प्रोफेश्नल टॅक्स आकारतात. जो तुमचं प्रोफेशन किंवा व्यापारावर अवलंबून असतो. काही राज्ये प्रोफेश्नल कर लादतात, तर काही राज्यांकडून यात सूट दिली जाते. प्रोफेश्नल टॅक्स सामान्यतः मासिक स्वरूपात भरला जातो तर, इन्कम टॅक्स सामान्यतः दरवर्षी भरला जातो आणि या करात वाढीव स्लॅब असतात, तर प्रोफेश्नल टॅक्समध्ये निश्चित स्लॅब असतात जे राज्यानुसार बदलतात. उत्पन्न कर स्वयं-फायलिंगद्वारे किंवा टीडीएसद्वारे भरला जातो, तर प्रोफेश्नल टॅक्स नियोक्ते पगारदार व्यक्तींकडून वजा करतात.
Galgotias University : एआय समिट, गॅलगोटियास विद्यापीठ अन् रोबोटिक डॉग; नेमका वाद काय?
भारतातील सर्व राज्य आकारतात का प्रोफेश्नल टॅक?
भारतात सर्व राज्यांमध्ये प्रोफेश्लन टॅक्स आकारला जातो का? तर नाही. हा कर आकारणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे तर, प्रोफेश्नल टॅक्स न राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि लक्षद्वीप या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
