Download App

Election 2023 Exit Poll : एक्झिट पोल अन् ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय?

  • Written By: Last Updated:

Election 2023 Exit Poll : सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतदान प्रक्रिया आज संपत आहे. रविवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, याचा अंदाज बांधला जाईल. दरम्यान, हा एक्झिट पोल (Exit polls) म्हणजे नेमंक काय? एक्झिट पोल कसा घेतला जातो, एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यातील नेमका फरक काय? याच विषयी जाणून घेऊ.

मोठी बातमी! राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवीन नियम 

एक्झिट पोल म्हणजे काय?

निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर एक्झिट पोल येतात. मतदानानंतरच एक्झिट पोल दाखवण्याची परवानगी आहे. त्यात अंकशास्त्र असतं. एक्झिट पोल काढण्याचे काही नियम असतात. त्यामुळे याच पोलबद्दल एक विश्वासार्ह वातावरण असतं. अचूक जागांचे अंदाज दाखवता येत नसले तरी देशाचा एकंदरीत कल कोणत्या बाजून आहे, हे सांगण्यासाठी एक्झिट पल महत्वाचे ठरतात. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज, सी व्होटर आणि चाणक्य यांचे एक्झिट पोल आतापर्यंतचे सर्वात विश्वसनीय मानले जातात.

एक्झिट पोल कसा घेतला जातो?

मतदानाच्या दिवशीच एक्झिट पोल घेतले जातात. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान केल्यानंतर मतदाराला कोणाला मतदान केलं, यासंबंधी विचारलं जात. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली असते. मतदान करून येणारा पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्य आधारे सर्वे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.

T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं रचला इतिहास! T20 वर्ल्डकपसाठी ठरला पात्र… 

एक्झिट पोल कधी सुरू झाले?

एक्झिट पोल कधीपासून सुरू झाले यावर मतभेद आहेत. नेदरलॅंडमधील समाजशास्त्रज्ञ आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरूवात केली असं म्हटलं जातं. पहिला एक्झिट पोल 15 फेब्रुवारी 1967 रोजी आला होता.

भारतातील पहिला एक्झिट पोल
भारतातील पहिला एक्झिट पोल 1996 मध्ये घेण्यात आला होता. प्रशासनानेही यामध्ये पूर्ण सहकार्य केले. ठराविक फ्रिक्वेन्सीसह आलेल्या ठराविक मतदाराला सांगितले जायचं की, तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारून घेतला जायचा, अशा प्रकारे पहिला एक्झिट पोल घेण्यात आला. देशातील आघाडीचे निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी पहिल्या एक्झिट पोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ओपिनियन पोल म्हणजे काय?

कोणत्या पक्षाकडे लोकांचा कल आहे याचा अंदाज बांधणे हा ओपिनियन पोलचा उद्देश असतो. हे सर्वेक्षण वैज्ञानिक नाही. या सर्वेक्षणात आकडेवारी, कोणतेही नियम वापरले जात नाहीत. शिवाय, मतदान प्रक्रियेपूर्वी जनमत चाचण्या घेतल्या जात असल्याने, ही सर्वेक्षणे सत्ताधारी पक्षाला अनुकूल असल्याचा समज आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी पत्रकार लोकांना भेटून त्यांना प्रश्न विचारतात आणि प्रश्नांच्या माध्यमातून लोकांचा कल समजून घेतात.

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यात फरक काय?

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मधील मुख्य फरक हा आहे की एक मतदानापूर्वी घेतला जातो आणि एक मतदानानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदानापूर्वी ओपिनियन पोल सादर केला जातो. मतदानापूर्वी विविध मतदारसंघांना भेटी देऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो. मतदानापूर्वी ओपिनियन पोल घेण्यात आला असल्याने तो बदलू शकतो. तर एक्झिट पोल निकालाच्या अगदी जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो.

Tags

follow us

वेब स्टोरीज