Download App

Patna Meeting : बैठकीनंतर विरोधकांचं पुढचं पाऊल काय? नितीश कुमारांनी सांगून टाकलं…

Image Credit: Letsupp

Patna Meeting : भाजपविरोधात दंड थोपटलेल्या सर्वच विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर पुढील काळात आणखी बैठक पार पडणार असून त्या बैठकीचं आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीनंतरच विरोधकांचं पुढचं पाऊल काय असणार? याबद्दल सांगितलं आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?

नितीश कुमार म्हणाले, देशात सर्वजण इतिहास बदलू पाहत आहेत. सत्ताधारी लोकं स्वातंत्र्याचा इतिहासही बदलतील. त्यामुळेचं त्यांना त्यांना वेळीच रोखणं गरजेचं असल्याचं नितीश कुमारांनी स्पष्ट केलंय.

Video …जेव्हा शांत, संयमी हरिभाऊ बागडे अधिकाऱ्यांना फैलावर घेतात, पाहा व्हिडीओ

तसेच देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची आजची चांगली बैठक पार पडली असून बैठकीत सर्व विरोध पक्षनेते एकत्र चालणार असल्याचं ठरलं आहे. यासोबतच आगामी निवडणुका सर्वांनी मिळून एकत्र लढणार असल्याचं निश्चित झाल्याचं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

आधुनिक कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘आधारवड’ मराठी चित्रपट 23 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला

विरोधकांच्या आजच्या बैठकीनंतर आता आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीचे आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार असून पुढील बैठकीतच विरोधकांच्या अजेंड्याला अंतिम स्वरुप येणार असल्याचं नितीश कुमारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सध्या देशात सत्ताधारी देशाच्या हिताचं काम करत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. यापुढील काळात सर्व विरोधक कोण कुठे, आणि कसं लढणार आहेत, याबाबत स्पष्ट होणार असून सर्वजण मिळून काम करणार असल्याचं एकमत ठरल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

Tags

follow us

वेब स्टोरीज