वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?

India vs West Indies Team Announcement: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अत्यंत संतुलित संघ निवडला आहे. यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाडचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा केएस भरतवर विश्वास दाखवला आहे. यशस्वी जैस्वाल देखील संघाचा एक भाग आहे. मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि ईशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. किशनला अजून कसोटी पदार्पण व्हायचे आहे. ईशानची वनडे आणि कसोटी अशा दोन्ही संघात निवड झाली आहे.

गौतम अदानींच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अमेरिकेतही चौकशी होणार

रविचंद्रन अश्विनचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुजाराला विशेष काही करता आले नाही. फलंदाजीदरम्यान तो खूप संघर्ष करताना दिसला होता.

ICC WC Qualifiers: विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने तोंडाला लावला टेप, आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार, व्हिडिओ व्हायरल

कसोटी संघ:
रोहित शर्मा (C), अजिंक्य रहाणे (VC), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (WC), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (WC), इशान किशन (WC), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube