What Is Vehicle To Vehicle Technology : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर आपण काडाक्याचं भांडण झालेलं चित्र अनेकदा पाहिलं आहे किंवा ऐकलं आहे. मात्र, आता अपघातानंतर कडाक्याचं भांडण इतिहास जमा होणार आहे. कारण, नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून रस्त्यावर वेगानं धावणाऱ्या गाड्या एममेकींशी संवाद साधू शकतील अशा तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. ऐकून थोडं वेगळं वाटलं ना? पण, या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर अपघाताला आळा बसण्याबरोबर प्रवाशांचा लाखमोलाचा जीवदेखील वाचणार आहे. नेमकी काय आहे भविष्यात कार्स एकमेकींशी संवाद साधू शकणारी V2V टेक्नोलॉजी ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
आता संपूर्ण देशभरात समान टोल आकारला जाणार; नितीन गडकरींच्या वक्तव्याने वाहनधारकांना दिलासा
व्हेईकल-टू-व्हेईकल कम्युनिकेशन टेक्नोलॉजी नेमकी काय?
आतापर्यंत तुम्ही कार्टूनमध्ये म्हणा किंवा अॅनिमेटेड मुव्हीजमध्ये कार्स एमेकांशी बोलताना बघितले असेल. पण, आता हे बोलणं भविष्यात तुम्ही चालवत असलेल्या कार्समध्येही प्रत्यक्षात अंमलात आणलं जाऊ शकणार आहे. कारण भारत सरकारने वाहनांमधील संवादासाठी 30 GHz रेडिओ फ्रिक्वेन्सी बँडचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे. हे तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेत एका नवीन युगाची सुरुवात मानली जात आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या या नव्या प्रणालीला व्हेईकल-टू-व्हेईकल म्हणजेच V2V असे संबोधलं जात. या प्रणालीअंतर्गत, एक वाहन दुसऱ्या वाहनाशी वायरलेस पद्धतीने माहिती शेअर करू शकणार आहे. जेव्हा जेव्हा समोरील वाहन अचानक ब्रेक मारेल, अचानक वळन घेईल किंवा धोक्याची स्थिती निर्माण करेल त्यावेळी V2V तंत्रज्ञान या सर्व परिस्थितींबद्दल ड्रायव्हरला आधीच सतर्क करेल.यामुळे साखळी-लिंक अपघातांसारख्या (Road Accident) घटनांमध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. What Is Vehicle To Vehicle Technology
वाहनांमध्ये V2V प्रणाली कशी काम करते?
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, वाहनांमध्ये V2V प्रणाली कशी काम करते? तर, याचं उत्तर अगदी सोपं आहे. V2V प्रणाली काही मिलिसेकंदात रेडिओ सिग्नलद्वारे वेग, ब्रेकिंग, लेन बदल आणि धोक्याची माहिती इतर वाहनांना पाठवेल. ही प्रणाली सक्रिय करण्यासाठी, वाहनात सिम कार्डसारखे दिसणारे एक छोटे उपकरण बसवले जाईल. हे उपकरण जवळच्या वाहनांमधून सतत सिग्नल प्रसारित करेल आणि प्राप्त करेल. V2V थेट रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करते, त्यामुळे त्याला मोबाईल इंटरनेट किंवा नेटवर्कची आवश्यकता नसल्याने दुर्गम आणि नेटवर्क-मुक्त भागातही विश्वसनीयरित्या कार्य करेल.
Good News : वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार; गडकरींची संसदेत मोठी घोषणा
कार्समध्ये कधीपासून कार्यरत होणार?
आता तुम्ही म्हणालं या टेक्नलॉजीमुळे अपघातानंतर काडाक्याचं भाडणं थांबेल पण, हे कार्समध्ये कधीपासून कार्यरत केलं जाणार आहे. यासाठी किती पैसे मोजावे लागणार? तर, रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते, 2026 च्या अखेरीस टप्प्याटप्प्याने V2V तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सुरुवातीला, ही प्रणाली नवीन वाहनांमध्ये प्रदान केली जाईल, त्यानंतर हळूहळू ती इतर वाहन श्रेणींमध्ये समाविष्ट केली जाईल. यासाठी वाहनचालकांना किती पैसे मोजावे लागतील तर, याबाबत अद्याप कोणतीही माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. पण एकूणचं काय तर, भारतात गंभीर मुद्दा बनलेल्या रस्ते अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून टाकलेलं हे पाऊल करोडो प्रवाशांचा जीव वाचवणारं आणि कात टाकणारं ठरेल.
