Video : महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरुन ‘तू तू मैं मैं’; नितीन गडकरी वैतागले, व्हिडिओ होतोय व्हायरल

नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर दोन महिला अधिकारी बसल्या होत्या.

  • Written By: Published:
News Photo (60)

नागपुरमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nagpur) समोरच दोन महिला अधिकारी चांगल्याच भिडल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमातच खुर्चीसाठी या महिलांची रेटारेटी झाली. 17 व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी 51 हजाराहून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसल्या होत्या. त्यांच्यामध्ये हा वाद झाला.

या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती. त्यांच्या नावाची पाटीही टेबलवर ठेवण्यात आली होती. मात्र, त्या सोप्यावर दोन महिला अधिकारी बसल्या. यातील एकीची बदली दक्षिण भारतात झाली होती. मात्र, त्यांनी अद्याप मुख्यालय सोडलेलं नाही. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. या दोन्ही अधिकारी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या. दोघीही व्यासपिठावर एकाच खर्चीवर बसल्या आणि खुर्चीवरुन दोघींमध्ये धक्काबुक्की सुरु झाली. एकमेंना धक्के मारून त्या खर्चीवरून उठवत होत्या.

जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा; भाजपमधील जोरदार इन्कमिंगवरून गडकरींचा इशारा

हे सगळ होत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले. त्यांनी या दोघींकडे एकदा पाहिलं देखील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. एरवी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती खुर्चीसाठी भांडताना अनेकदा पाहिलं असेल. या कार्यक्रमांमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून वाद रंगाची चर्चा आहे. विशेष म्हणजे मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असताना हे सगळं घडलं त्यामुळे याचं गांभीर्य देखील महिलांनी लक्षात घेतली नाही. भारतीय डाक विभागातील दोन महिला अधिकारी एकाच सोफ्यावर बसल्या होत्या. त्यावर विद्यमान पोस्टमास्टर जनरल या नावाची नेम प्लेट होती.

एका महिला अधिकाऱ्यांची बदली झाल असताना अद्याप रिलीव्ह करण्यात आले नाही. अशातच नवी मुंबईतील एका दुसऱ्या महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी पदभार सोपवलले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्यात दोन्ही महिला अधिकारी एकाच कार्यक्रमावर उपस्थित असताना खुर्चींवरून वाद जुंपल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात दोन्ही महिला अधिकारी एकमेकांना तिकडे जाऊन बस असं बोलताना दिसून येत आहे.

 

 

follow us