अमेरिकेची मिथून रास आहे. (War) दशमस्थानावार काही पाप घडतात तेव्हा त्या देशाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या लग्नात मंगळ आहे. त्यामुळे आता हे सगळ घडत आहे. ट्रम्पच्या माध्यमातून अमेरिकेने केलेली ही आत्महत्या असं आपल्याला म्हणता येईल. आज अमेरिकेची मोठी वाईट अवस्था झालेली आहे. अमेरिका एकटी पडलेली आहे. तसंच, यापुढेही अमेरिकेच नुकसान होईल अस म्हणत अनेक मुद्दे प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधताना मांडले आहेत.
जून 2027 पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे खराब आहे. त्यांच्यावर महाभियोग चालवून ट्रम्प यांना पायउतार व्हाव लागेल असंही मारटकर म्हणाले आहेत. मागचा काही काळ हा आर्थिक घडी विस्कळीत करणारा होता. पुढेही काही दिवस महागाई वाढण, काही गोष्टी उपलब्ध नसतील असंही मारटकर म्हणाले. त्याचबरोबर 2027 जून नंतर भारतीय राजकारणात मोठ्या गोष्टी घडतील असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी एपिस्टीन फाईल्सचाही उल्लेख केला.
पाकिस्तानचा शांततेचा प्रस्ताव इराणने फेटाळला, युद्ध भडकण्याचे संकेत
हा सगळा सुरू असलेला विस्कळीतपणा किमान वर्षभर राहील, अनेक देशांना ऑईल कमी पडण, गॅस कमी पडण असं दिसू शकत. दरम्यान, शनि बघडल्याने अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सामान्य मानसाचे हाल होतील असंही ते म्हणाले. यावर्षीचं पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचीही अडचण होईल, त्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होईल असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी युद्ध समाप्तीबाबतही वक्तव्य केलं आहे.
आता 23 एप्रिल रोजी शनी आणि मंगळची युती असल्याने हे युद्ध 19 एप्रिलपर्यंत थांबेल आणि 23 एप्रिलपर्यंत पूर्णपणे शांतता प्रस्तापित होईल असंही ते म्हणाले आहेत. आज मंगळ असल्याने हे सुरू आहे. परंतु, हे युद्ध थांबल्यावरही काही देशांमध्ये युद्धाची शक्यता आहे. त्यामध्ये भारतही असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
