Download App

पोलिसांची नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा कोण आहे? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Who Is Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबा (Bhole Baba) सत्संगात चेंगराचेंगरी झाली.

Image Credit: Letsupp

Who Is Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबा (Bhole Baba) सत्संगात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 122 भाविकांचा मुत्यू झाला आहे. या सत्संगात लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते मात्र ज्याच्या सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली ते भोले बाबा कोण आहे असा प्रश्न आता सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये भोले बाबांचा सत्संग खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे बाबांच्या सत्संगात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. भोले बाबा यांचा नाव नारायण साकार हरी असं आहे. मात्र त्यांचे अनुयायी त्यांना विश्व हरी भोले बाबा म्हणून ओळखतात. भोले बाबा मूळचे कासगंजच्या पटियाली गावचे आहेत. त्यांनी पतियाळी येथे आश्रम बांधला आहे.

भोले बाबा संत होण्यापूर्वी यूपी पोलिसात नोकरी करत होते. 17 वर्षांपूर्वी त्यांनी पोलीसची नोकरी सोडली आणि त्यानंतर आपल्या गावात एका झोपडीत राहू लागला तसेच गावोगावी जाऊन सत्संगाला सुरुवात केली. तर आज त्यांचे लाखो अनुयायी असून ठिकठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते.

भोले बाबा इतर संतांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांची लाईफ स्टाईल देखील इतर संतांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भोले बाबा नेहमी पांढऱ्या रंगाच्या पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसतात आणि नेहमी सिंहासनावर बसून प्रवचन देतात. तर दुसरीकडे त्यांचे अनुयायी लाबी शर्ट-पँट आणि पांढरी टोपी घालतात.

माहितीनुसार, त्यांचे अनुयायी फक्त उत्तर प्रदेशातच नव्हे तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातही मोठ्या संख्येने आहे. त्यांचा सत्संग जेथे होतो तेथे त्यांचे अनुयायी संपूर्ण व्यवस्था सांभाळतात.

तर दुसरीकडे सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाला तब्बल 1.25 लाख लोक उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागेल होते त्यामुळे अनेक जण बेहोश होऊ लागले होते तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सव्वा लाख भाविक, प्रवचन अन् अचानक चेंगराचेंगरी, शंभरहून अधिक मृत्यू, ‘हे’ आहे खरे कारण

जेव्हा बेहोश होऊन लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केले.

follow us

वेब स्टोरीज