Download App

Satya Pal Malik : IAS अधिकारी ते खळबळ उडवून देणारा नेता व्हाया राज्यपाल!

Satya Pal Malik : अनुभवी राजकारणी (Politician)आणि जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 2019 मध्ये पुलवामा (Pulwama)येथील सीआरपीएफच्या (CRPF)जवानांवर झालेल्या हल्ल्यात गृहमंत्रालयाची (Ministry of Home Affairs)अक्षम्य चूक होती, त्यामुळेच हा हल्ला झाला, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींनी त्यांना शांत बसण्यासही सांगितले होते. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी त्यांना फक्त तुम्ही सध्या शांत राहा असं सांगितलं. त्यांच्या या खळबळजनक खुलाशामुळे चर्चांना उधाण आले आहे. आता सरकारच्या परिस्थिती हाताळण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विवाद असूनही, मलिक हे भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे, जे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि सार्वजनिक सेवेतील वचनबद्धतेसाठी ओळखले जातात.

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : शिवाजी कर्डिलेंच्या मैदानात कुस्ती लंके-विखेंची

सत्यपाल मलिक असे एक राजकारणी आहेत, ज्यांनी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल, गोव्याचे राज्यपाल आणि मेघालयचे राज्यपाल यासह विविध पदांवर काम केले आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी बागपत, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी 1968 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) सदस्य म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1990 मध्ये संरक्षण मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये विविध पदांवर काम केले. 1990 ते 1993 या काळात त्यांनी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ते काँग्रेस पक्षात सहभागी झाले. त्यावेळी त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांनी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह, आणि त्यांनी संरक्षण समिती आणि गृह व्यवहार समितीसह विविध समित्यांमध्ये काम केले आहे. 2009 मध्ये सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि बहुजन समाज पक्षात (BSP) प्रवेश केला. 2009 ची लोकसभा निवडणूक त्यांनी उत्तर प्रदेशमधील बागपत मतदारसंघातून लढवली होती. पण त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुढे 2013 मध्ये सत्यपाल मलिक यांनी भाजपात प्रवेश केला.

पुढे 2018 मध्ये, सत्यपाल मलिक यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र अल्पकाळातच त्यांची जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सत्यपाल मलिक यांची 2019 मध्ये पुन्हा गोव्याच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. 2021 पर्यंत त्यांनी याठिकाणी काम केल्यानंतर पुढे त्यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. सत्यपाल मलिक यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते प्रामाणिकपणा, सचोटी आणि सार्वजनिक सेवेतील वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. देशाच्या विकासातील योगदान आणि तेथील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो.

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला आहे की, 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाला. मलिक यांनी यासाठी सीआरपीएफ आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दोषी ठरवलं आहे. त्यावेळी राजनाथ सिंह हे गृहमंत्री होते. त्यात मलिक यांचा आरोप आहे की, सीआरपीएफने जवानांना घेऊन जाण्यासाठी विमान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र गृमंत्रालयाने नकार दिला. सीआरपीएफची तुकडी जाताना संबंधित मार्गाची योग्य तपासणी झाली नाही, असाही आरोप करण्यात आला आहे. सत्यापाल मलिक यांनी दावा केला की, याविषयी पंतप्रधान मोदींना फोन केल्यावर त्यांनी आपल्याला गप्प बसायला सांगितलं.

त्याचबरोबर आरएसएसचे नेते राम माधव यांच्यावरही सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. एक दिवस राम माधव यांनी एका प्रकल्प मंजुरीच्या बदल्यात आपल्याला 300 कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती, पण ती आपण फेटाळून लावली असल्याचा आरोप केला आहे.

Tags

follow us