Abhijit Muhurat Significance : अयोध्येतील राम मंदिरावर आज (दि.25) धर्म ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. यासाठी अभिजित मुहूर्त निवडण्यात आला आहे. पण, भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा अन् ध्वजारोहण, राममंदिराची सर्व कार्य अभिजित मुहूर्तावरच का? केली जातात? या मुहूर्ताला एवढं महत्त्व का? याबद्दल जाणून घेऊया…
हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक शुभ आणि अशुभ काळांचे वर्णन केले आहे. अशुभ काळांमध्ये राहुकाल, यमघंटा काळ, गुलिका काळ आणि भद्रा यांचा समावेश आहे. शुभ काळांमध्ये प्रदोष काळ, गुरु पुष्य काळ, अमृत सिद्धी काळ आणि अभिजित मुहूर्त यांचा समावेश आहे. या शुभ काळांमध्ये अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurat) हा विशेष महत्त्वाचा मानला जातो.
आजचा अभिजित मुहूर्त 2025
मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी विवाह पंचमीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात ध्वजारोहण समारंभ होणार आहे. या समारंभाचा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त आहे, जो आज सकाळी 11:45 ते दुपारी 12:29 पर्यंत आहे.
अयोध्येचं राम मंदिर 45 किलो सोन्याने चमकतंय! किती खर्च आला? घ्या जाणून
अभिजित मुहूर्ताला खास का मानले जाते?
धार्मिक शास्त्रांनुसार, अभिजित मुहूर्त हा एक शुभ आणि विजयी काळ आहे. तो दिवसाच्या मध्यान्यावेळी म्हणजेच 12 वाजता येतो आणि सुमारे 48 मिनिटे टिकतो. हा मुहूर्त अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम मानला जातो आणि या काळात केलेले कोणतेही काम यश मिळवून देते. म्हणूनच या मुहूर्ताच्या दरम्यान राम मंदिरासाठी शुभ समारंभ आयोजित केले जातात.
भगवान श्रीराम यांचा जन्म
अभिजित मुहूर्ताची वेळ सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार दररोज बदलते. बुधवारी अभिजित मुहूर्ताच्यावेळी कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता अभिजित मुहूर्ताच्यावेळी झाला होता. अभिजित मुहूर्ताच्यावेळी भगवान शिव यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणूनच हिंदू धर्मात या मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे.
राम मंदिर सोहळा, शंकराचार्य अन् विरोध; जाणून घ्या हिंदू धर्मातील महत्त्व
अभिजित मुहूर्ताचे महत्त्व
विजयाची प्राप्ती : अभिजीतचा अर्थच ‘विजय’ असा होतो, म्हणून या मुहूर्तावर केलेले काम यशस्वी होते.
सर्व दोष दूर करणे : असे मानले जाते की या शुभ मुहूर्तात सर्व दोष दूर करण्याची शक्ती आहे.
शुभ कार्यांसाठी योग्य: जर शुभ मुहूर्त उपलब्ध नसेल, तर या मुहूर्तात लग्न, गृहस्नान इत्यादी शुभ कार्ये करता येतात.
धर्मध्वजाची वैशिष्ट्ये काय?
श्री राम लल्लाच्या पवित्र मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाचा धर्म ध्वज लागणार
ध्वजावर तीन प्रतिकं, ज्यात सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान
राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही 191 फूट
यामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट
हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रूंद
ध्वजाचे वजन 2 ते 3 किलोग्रॅम
161 फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वजाची निर्मिती
यासाठी 360 कोनातून फिरणारा बॉल-बिअरिंगचा वापर
(डिस्क्लेमर : या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. लेट्सअप याबाबत कोणताही दावा करत नाही.)
