नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi)मोदी आडनावावरुन टीका करणं महागात पडलं आहे. सुरत न्यायालयाने (Surat Court)त्यांना यामध्ये दोषी मानून दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकीही रद्द केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी कॉंग्रेस पक्षाची माफी (apology)मागितली आहे. काँग्रेसने राजघाटावर आयोजित केलेल्या सत्याग्रहादरम्यान पवन खेडा यांनी मंचावरून सर्वांची जाहीर माफी मागितली.
खेडा यांनी गेल्या वर्षी एक ट्विट केले होते, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, हे ट्विट स्वार्थापोटी केले असून राहुल गांधींकडून प्रेरणा घेऊन त्यांना आपली चूक कळाली आहे. पवन खेडा म्हणाले की, सत्तेपासून दूर असूनही राहुल गांधी तपश्चर्या करत आहेत. खरे तर पवन खेडा यांना राज्यसभेचे तिकीट (Rajya Sabha ticket)न मिळाल्याने त्यांनी ट्विट केले की, कदाचित माझ्या तपश्चर्येत काही कमतरता असेल.
मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांवर दबाव; जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप
खेडा म्हणाले की, मी राहुल गांधींना पाहतो. त्यांनी आपली सत्ता सोडली पण तपश्चर्या चालूच आहे. यापेक्षा मोठी तपश्चर्या कोणती असू शकते? माझ्या चुकीबद्दल मी माझ्या पक्षाची आणि पक्षनेतृत्वाची माफी मागतो, असे पवन खेडा म्हणाले. पवन खेडा यांनी गेल्या वर्षी 29 मे रोजी हे ट्विट केले होते. काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत पवन खेरा यांच्या नावाचा समावेश केलेला नाही, कदाचित यामुळे ही माफी मागितली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसने राजघाटावर आयोजित केलेल्या सत्याग्रहादरम्यान पवन खेडा यांनी मंचावरून सर्वांची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, ‘मी आज तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला राहुल गांधी आणि प्रियंका गांधींकडून प्रेरणा मिळाली आहे. आवाज उठवण्याची आणि लढण्याची वेळ आली आहे. सत्ता मिळणे किंवा न मिळणे हा वेगळा मुद्दा आहे पण आम्ही लढून जिंकू असेही ते यावेळी म्हणाले.