Why PM Narendra Modi Russian President Vladimir Putin Sits in a white Toyota Fortuner : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे काल (दि.) संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः विमानतळावर त्यांच्या स्वागतसाठी उपस्थित होते. स्वागतानंतर लगेचच, दोन्ही नेते ज्या कारमधून एकत्र निघाले ती कार कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. ही कार पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर आहे. आता प्रश्न असा आहे की, जगातील सर्व सुरक्षित गाड्या सोडून मोदी आणि पुतिन फॉर्च्युनर गाडीत का बसले? त्याबद्दल जाणून घेऊया…
Putin India Visit : रशिया भारताचा फॉरएवर बेस्ट फ्रेंड का? 5 प्वॉइंट्समध्ये समजून घ्या…
मोदी रेंज रोव्हर तर पुतिन सेनाटमधून करतात प्रवास
पंतप्रधान मोदींचा ताफा सामान्यतः खूप कडक प्रोटोकॉल पाळतो. ते सहसा जगातील सर्वात सुरक्षित वाहन मानल्या जाणाऱ्या रेंज रोव्हरमध्ये प्रवास करताना दिसतात. तर, पुतिन ज्या कारमध्ये प्रवास करतात ती ऑरस सेनाट लिमोझिन आहे. ही कार सहसा परदेश दौऱ्यांवर पुतिन यांच्यासोबत असते. पुतिन ( Vladimir Putin) यांच्या परदेश दैऱ्यामध्ये असणारी सेनाट त्यांच्या सुरक्षा पथकाचा एक महत्त्वाचा भाग असते. ही कार मॉस्कोच्या ऑरस मोटर्सने बनवली आहे. पण यावेळी, दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पारंपारिक गाड्या सोडून टोयोटा फॉर्च्युनर निवडली,
एकत्र प्रवास केलेल्या फॉर्च्युनरची खासियत काय?
मोदी आणि पुतिन यांनी एकत्रित प्रवास केलेली फॉर्च्युनर कार महाराष्ट्र पासिंगची होती. जिचा नोंदणी क्रमांक MH01EN5795 असा होता. या मॉडेलबद्दल सांगायचे झाले तर, हे मॉडेल फॉर्च्युनर सिग्मा 4 MT (मॅन्युअल मॉडेल) आहे. सरकारी नोंदींनुसार, ही कार BS-VI प्रकाराची असून, एप्रिल 2024 मध्ये याची नोंदणी करण्यात आली आहे. या कारचे फिटनेस प्रमाणपत्र एप्रिल 2039 पर्यंत वैध असून, PUC प्रमाणपत्र जून 2026 पर्यंत वैध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची सुरुवातीची किंमत अंदाजे 38.11 लाख (एक्स-शोरूम) असून, ही 7-सीटर मध्यम आकाराची एसयूव्ही अंदाजे 4,795 मिमी लांब, 1,855 मिमी रुंद तर, 1,835 मिमी उंच आहे. या कराचा व्हीलबेस 2,745 मिमी आहे.
छोट्याशा उंदारला घाबरले अन्…; पावरफुल पुतिन यांच्या कधीच जगासमोर न आलेल्या गोष्टी वाचल्या का?
18 इंच चाकांवर चालणारी ही एसयूव्ही इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट अॅडजस्टमेंट, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (एसी), पॉवर विंडो आणि सॉफ्ट-टच इंटीरियर फिनिशिंग सारखी वैशिष्ट्ये देते. याची इंधन टाकीची क्षमता 80 लिटर आहे. यात सात एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, वाहन स्थिरता नियंत्रण (VSC), ब्रेक असिस्ट (BA), हिल असिस्ट, डाउनहिल असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आहेत.
फॉर्च्यूनर का निवडली?
पंतप्रधान आणि रशियन राष्ट्राध्यक्षांनी एकत्रित प्रवास करण्यासाठी याच कारची निवड का केली तर, हा निर्णय पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील परस्पर विश्वासाचे प्रतिबिंबित करतो. अनेक विश्लेषकांनी याला दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक संबंधांच्या खोलीचे आणि त्यांच्या सहजतेचे उदाहरण म्हणून उद्धृत केले.
