राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि भडकावू कंटेंट’चा ठपका; केंद्र सरकारने कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खाते का बंद केले?

तरुणांमध्ये खात्याचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्याने देशाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी आयबीची भूमिका.

Untitled Design 68 1

Untitled Design 68 1

Why was the Cockroach Janata Party’s X account blocked? : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यवस्थेवर हॉल करणाऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर तयार करण्यात आलेल्या व्यंगात्मक कॉकरोच जनता पार्टी या एक्स हँडलवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारत बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी हे खाते भारत बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. द इंडियन एक्स्प्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार गुप्तचर विभागाने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंता व्यक्त केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A अंतर्गत एक्सला हे खाते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले.

सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टी हे खाते आक्षेपार्ह आणि भडकाऊ स्वारीपाचे कन्टेन्ट पोस्ट करत होते. विशेषतः तरुणांमध्ये या खात्याचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्याने देशाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी आयबीची भूमिका होती. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69A अंतर्गत केंद्र सरकारला देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा गुन्ह्यांना चिथावणी रोखण्यासाठी कोणतीही माहिती सार्वजनिकरित्या ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. 2009 मधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियमांतर्गत ही प्रक्रिया गोपनीय ठेवली जाते.

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट? संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ

भारतामध्ये हे एक्स खाते ब्लॉक करण्यात आले असले तरी इतर देशांमध्ये ते अद्याप उपलब्द्ध आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत या खात्याचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले होते. दुसऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, खाते ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला तेव्हा त्याचे सुमारे 90 हजार फॉलोअर्स होते.

दरम्यान, या प्लॅटफॉर्मशी संबंधित इंस्टाग्राम खाते भारतात अद्याप बंद करण्यात आलेले नाही. त्या खात्याचे तब्बल 1.6 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या खात्यावर देखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर गृह मंत्रालय, मेटा आणि एक्सकडुन कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या प्लॅटफॉर्मची संस्थापक अभिजित दिपके यांनी एक्सवर पोस्ट करत, अपेक्षेप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचे खाते भारतात बंद करण्यात आले आहे, असे म्हटले. काही वेळातच त्यांनी कॉकरोच इज बॅक नावाने नवीन खाते सुरू केल्याची घोषणा केली आणि समर्थकांना त्या नव्या खात्याववर जोडण्याचे आवाहन केले. एक्सच्या कन्टेन्ट मॉडरेशन धोरणानुसार, अधिकृत सरकारी संस्थेकडून वैध कायदेशीर मागणी प्राप्त झाल्यास संबंधित देशात खाते किंवा पोस्ट बंद केली जाऊ शकते. प्लॅटफॉर्मच्या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा कारवाया केवळ संबंधित देशाच्या कायद्यांनुसार मर्यादित स्वरूपात केल्या जातात.

Exit mobile version