Download App

“माझ्या पतीवर अतिरेक्यांनी पहिली गोळी झाडली, आता सरकारने..” शुभम द्विवेदीच्या पत्नीची मोठी मागणी

दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. 

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांना (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद्यांना गोळ्या घालून मारले. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ते हिंदू असल्याची खात्री करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा देखील मृत्यू झाला. शुभम आणि त्याची पत्नी लग्नानंतर दोन महिन्यांनी काश्मीर फिरायला आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

मयत शुभमची पत्नी ऐशन्याने माध्यमांशी संवाद साधली. माझी सरकारला एक विनंती आहे. अशा प्रकारचे जे हल्ले होतात त्यात जे लोक मारले जातात. त्यांच्या कुटुंबाला नंतर लोक विसरुन जातात. पुलवामा असो की मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो. लोकांना नंतर काही देणंघेणं नसतं. शुभमला कुणी विसरू नये असं मला वाटतं. शुभमला शहीद हा दर्जा मिळाला पाहिजे. हीच माझी सरकारकडे मागणी आहे. त्याला शहीदचा दर्जा मिळाला तर आम्ही मान उंचावून सांगू शकतो की आम्ही हिंदू आहोत. सरकारने शुभमला शहीदचा दर्जा द्यावा.

Pahalgam Terror Attack : पीडित कुटुंबांना न्याय मिळणार! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन

हिंदू आहोत सांगताच अतिरेक्यांनी गोळी झाडली

दहशतवादी आमच्याकडे आले त्यातील एकाने विचारलं हिंदू आहात की मुसलमान? मला वाटलं ते मस्करी करत आहेत. मी मागे वळाले हसले त्यांना विचारलं काय? त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. नंतर मी उत्तर दिलं होय आम्ही हिंदू आहोत, लगेच दहशतावाद्यांनी गोळी झाडली. माझ्यासाठी सगळं काही संपलं. शुभमचा चेहरा रक्ताच्या थारोळ्यात होता. मला समजत नव्हतं की काय घडतंय? मलाही गोळी मारा मला का जिवंत ठेवताय असे मी त्यांना म्हटलं. पण त्यांनी (दहशतवादी) मला मारण्यास नकार दिला असे शुभमच्या पत्नीने सांगितले.

पहलगाममध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारताच्या कारवाईची ‘TRF’ला धडकी, मारली पलटी; पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली

follow us