भारताच्या कारवाईची ‘TRF’ला धडकी, मारली पलटी; पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा (Pahalgam Terror Attack) अतिरेक्यांनी बळी घेतला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. हिंदू असल्याची खात्री करून घेत त्यांना गोळ्या घातल्या. मानवतेला काळिमा फासणारं कृत्य अतिरेक्यांनी केलं. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंटने (TRF) घेतली होती. यानंतर भारत सरकारने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. भारतीय सैन्यानेही (Indian Army) दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले. या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडालीच पण टीआरएफमध्येही भीती पसरली. या कारवाईनंतर द रेजिस्टेंस फ्रंटने पलटी मारली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
या संदर्भात दहशतवादी संघटनेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. पहलगाम येथील घटनेत आमचा सहभाग नाही. आमचे डिजीटल हॅक करुन टीआरएफ या हल्ल्याला जबाबदार असल्याचा मेसेज टाकण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर ए तैयबाचा डिप्टी कमांडर सैफु्ल्ला कसुरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात कसुरीने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी नाकारली होती.
“जर भारतानं आमचं पाणी रोखलं तर आम्ही..”, पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांची पोकळ धमकी
हल्ल्यानंतर टीआरएफने घेतली होती जबाबदारी
याआधी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती. परंतु, भारताने आता ज्या पद्धतीने कारवाईस सुरुवात केली आहे ती पाहून संघटनेत भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानही चांगलाच घाबरला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. मागील 24 तासांत भारतीय सैन्याने काश्मीरातील सात अतिरेतक्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. तसेच या भागातील आणखीही अतिरेक्यांची घरे उद्धवस्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. टीआरएफला भीती वाटत आहे की आता भारत कोणत्याही परिस्थितीत बदला घेणार त्यामुळे संघटेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारीच नाकारली आहे.
पहलगाममध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कारवाई करावी; अन्यथा.. प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्यण