“जर भारतानं आमचं पाणी रोखलं तर आम्ही..”, पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांची पोकळ धमकी

Shahbaz Sharif Threatens India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड (India Pakistan Tension) वाढला आहे. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप होत आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी थेट पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती हा एक निर्णय भारत सरकारने घेतला आहे. सिंधू नदीतून एक थेंबही पाणी पाकिस्तानला जाणार नाही याची तयारी भारताने सुरू केली आहे. हाच एक निर्णय पाकिस्तानसाठी त्रासदायक ठरणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरळसरळ धमकीच दिली आहे.
पाकिस्तानचं पाणी (Pakistan News)कमी करणे किंवा अन्य ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आम्ही कोणत्याही कारवाईस उत्तर देण्यास तयार आहोत. शांतता हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करणार नाही असे शाहबाज शरीफ म्हणाले.
सिंधूतून पाणी नाहीतर रक्त वाहणार : बिलावल भुट्टो
याआधी पाकिस्तानील आणखी एक राजकीय नेते बिलावल भुट्टो यांनीही भारताला धमकी दिली होती. सिंधू नदीत एकतर पाणी वाहील नाहीतर रक्त वाहील. सिंधू खोरे आमचे आहे आणि आमचेच राहील असे भुट्टो म्हणाले होते. सिंधू नदी आमची होती. आमचीच राहील. या नदीतून एकतर पाणी वाहील नाहीतर त्यांचं रक्त जे आमची भागीदारी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पहलगाममध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर मंत्री नितेश राणेंच वादग्रस्त वक्तव्य, वाचा काय म्हणाले?