Download App

भारतात डिजिटल रुपया येणार? RBI कडून मोठी घोषणा…

Reserva Bank Of India : भारतात आता डिजिटल रुपया येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बॅंक डिजिटल चलनचा (CBDC) पायलट प्रकल्प लॉंच करण्याची शक्यता असल्याची माहिती आरबीआयचे संचालक अजय कुमार चौधरी यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी सांगितलं नेमकं काय ठरलं

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून हा प्रकल्प लॉंच करण्यासाठी देशातील काही महत्वपूर्ण बॅंकांची निवडही करण्यात आली असून यामध्ये अनेक राष्ट्रीयकृत बॅंकेचा समावेश करण्यात आला आहे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचएसबीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंकांचा समावेश आहे.

Horoscope Today: ‘मेष’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) हा प्रकल्प लॉंच केल्यानंतर प्रकल्पाचा व्याप जेवढा बाजारात वाढत जाईल, तसतसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना डिजिटल सुरक्षेवर काम करावे लागणार आहे, कारण सध्याच्या युगात सायबर गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं असून यामध्येही असे गुन्हे घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी बँकेचे सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कसारखे प्रश्न रिझर्व्ह बँकेसमोर उभे ठाकणार आहेत.

दरम्यान, पुढील काळात या प्रकल्पाची घोषणा आरबीआयकडून करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या दिल्लीत होत असलेल्या G20 परिषदेत आरबीआयचे संचालक अजय चौधरी यांनी माहिती दिली आहे, तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात CBDC प्रकल्पाच्या लॉंचिंगबाबत घोषणा केली. त्यानंतर वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us