Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू झाला आहे. यात मंजुनाथ राव यांची पत्नी व दहशतवाद्यामध्ये संवाद झाला आहे.
मंजुनाथ यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने दहशतवाद्यांना तिला मारण्याची विनंती केली. परंतु दहशतवाद्यांनी नकार दिला. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पल्लवी म्हणाली, “मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका. यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा. मंजुनाथ हा कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रहिवासी होता. कर्नाटकातील जोडप्याचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील एका पर्यटन स्पॉटवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात 10 पर्यटक जखमी झाले असून, दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
– @AmitShah #PahalgamTerroristAttack #Pahalgam #TerroristAttack #KashmirTerroristAttack #Kashmir #terrorism pic.twitter.com/czvBDdka0b
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 22, 2025
त्याच्या पत्नीसोबतचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ श्रीनगरमधील दाल सरोवराचा आहे. यामध्ये, कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ व पत्नी काश्मीरच्या त्यांच्या भेटीबद्दल सांगत आहेत. मंजुनाथने हा व्हिडिओ प्रवासाचा अनुभव म्हणून बनवला आहे. यामध्ये, मंजुनाथ काजल मॅम नावाच्या व्यक्तीचेही छान सहल आणि व्यवस्थेबद्दल आभार मानत आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले कर्नाटकचे मंजुनाथ यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांनी काढलेला व्हिडिओ#TerroristAttack #Kashmir pic.twitter.com/vmnY9ZgcC8
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 22, 2025