Download App

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज PM मोदी बोलणार, विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देणार?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का?

Image Credit: Letsupp

Parliament Session : आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा सातवा दिवस. (Parliament Session ) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता आहे. (Rahul Gandhi) काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर मोदी (Modi) सरकारला चांगलंच घेरलं. या आरोपांना आज पंतप्रधान मोदी उत्तर देतील का?. पंतप्रधान संसदेत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजप नेत्यांनी स्वत:चे कान साफ करावेत; राहुल गांधींच्या हिंदू  वक्तव्यावर राऊतांची मोठी प्रतिक्रिया

लोकसभा संसदेतील कालचा दिवस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. लोकसभा निवडणूक, हिंदूत्व, राममंदिर, अयोध्येमधील भाजपचा पराभव, नीट परीक्षा, मणिपूर, जम्मू- काश्मिरसह अनेक विषयांवर राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं. राहुल गांधींच्या या आक्रमकतेमुळे भाजप नेत्यांची काल चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

आज पंतप्रधान मोदी राहुल गांधींच्या या आरोपांना उत्तर देतील. हिंदुत्व, अयोध्या, जम्मू-काश्मीर, अग्निवीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देतील अशी शक्यता आहे.

धक्कादायक! बुराडी सामूहिक आत्महत्येची पुनरावृत्ती; एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं जीवन

आज एनडीए सरकारच्या संसदीय दलाची आज बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह घटक पक्षातील महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. काल राहुल गांधींचे आक्रमक भाषण, लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर एनडीए घटकपक्ष आजची संसदेतील रणनीती आखण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज