MP Plane Crash : विमान अपघातात बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू

बेळगाव : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) तीन लढाऊ विमानांचा शनिवारी अपघात (Accident) झाला. त्यात दोन लढाऊ विमानांची एकमेकांत टक्कर झाली. नव्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका पायलटवर काळानं घाला घातलाय. बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी (Hanmantrao Sarathi)यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इतर दोन पायलट गंभीर जखमी झालेत. हवाई दलानं […]

Assasas

Assasas

बेळगाव : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) तीन लढाऊ विमानांचा शनिवारी अपघात (Accident) झाला. त्यात दोन लढाऊ विमानांची एकमेकांत टक्कर झाली. नव्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका पायलटवर काळानं घाला घातलाय. बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी (Hanmantrao Sarathi)यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इतर दोन पायलट गंभीर जखमी झालेत. हवाई दलानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत.
YouTube video player
हणमंतराव सारथी यांचे वडील रेवणसिद्द्पा सारथी (Revansiddapa Sarathi) हे सेनेमध्ये कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा एक भाऊ रवी हे सुद्धा हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताहेत. हणमंतराव यांचे पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर (Gvalher)येथे होतं. दैनंदिन सरावासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथून उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाची आणि अन्य एका विमानाची आकाशात धडक झाली. या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं.

त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुलं, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांचं पार्थिव आज हवाई दलाच्या खास विमानानं बेळगावात आणलं जाणार आहे. सारथी यांच्यवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-20 आणि मिराज 2000 ही दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघाताच्यावेळी सुखोई-30 मध्ये दोन वैमानिक आणि मिराज 2000 मध्ये एकेक वैमानिक होता. त्यात मिराजमधील वैमानिकाचा मृत्यू झालाय. तर, सुखोई-30 मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत.

Exit mobile version