Download App

Winter Session : जगदीप धनखड यांच्यावरील मिमिक्री करून राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी कोण?

  • Written By: Last Updated:

Winter Session : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या तब्बल 141 खासदारांचे निलंबन केले गेले आहे. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहांच्या पायऱ्यावर निलंबित खासदार एकत्र आले होते. त्यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यांच्या या मिमिक्रीचा व्हिडिओ काँग्रेस खासदार राहुल गांधी हे शूट करत होते. या व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Parliament Suspended : इतक्यात सुटका नाहीच! उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

काय आहे हा व्हिडीओ?

खासदारांचे निलंबन झाल्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या बाहेर मकरद्वार या ठिकाणी एकत्र आले होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची चित्र विचित्र हावभाव करत मिमिक्री केली. तर त्यांच्या या मिमिक्रीचा व्हिडिओ काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शूट केला. यावेळी त्यांच्या शेजारी काँग्रेसचे महासचिव के सी वेणूगोपाल देखील उभे होते. बॅनर्जी मिमिक्री करत होते. त्यावेळी विरोधी पक्षाचे खासदार त्यावर जोरजोरात हसत होते आणि त्यांच्या या मिमिक्रीला दाद देत होते.

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? वडिलांकडून मोठा खुलासा

कोण आहेत कल्याण बॅनर्जी?

कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे म्हणजेच तृणमूल काँग्रेसचे लोकसभेचे खासदार आहेत. ते पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर या मतदारसंघातून 2019 ला निवडून आलेले आहेत. 2001 ते 2006 या दरम्यान ते आमदार देखील होते. बॅनर्जी एक ख्यातनाम वकील देखील आहेत. तृणमूल पक्षाची कायदेशीर लढाई ही बॅनर्जी यांच्याकडूनच लढली जाते. तर या अगोदर नुकतच कल्याण बॅनर्जी यांचे एक वक्तव्य व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, नव्या संसदेत वॉशरूमसाठी अर्धा किलोमीटर दूर जावं लागतं. त्यावरून देखील गदारोळ झाला होता.

धनखड यांनी व्यक्त केली नाराजी…

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या मिमिक्रीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की मी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला. यामध्ये एक खासदार व्हिडिओ शूट करत होते. तर दुसरे खासदार माझी नक्कल करत होते. नीचपणाची परिसीमा गाठली गेली आहे. यांना सद्बुद्धी येवो. असं म्हणत अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज