Parliament Suspended : इतक्यात सुटका नाहीच! उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

Parliament Suspended : इतक्यात सुटका नाहीच! उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

Parliament Suspended : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची (Jagdeep Dhakhar) नक्कल करण्याचे प्रकरण इतक्यात शांत होईल असे वाटत नाही. या प्रकरणी सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे धनखड यांची (Parliament Suspended) नक्कल करणाऱ्या खासदारांच्याही अडचणी वाढल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका व्यक्तीने तक्रार दाखल करत बॅनर्जींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. देशाचे उपराष्ट्रपती यांचा अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत एका वकिलाने ही तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही तक्रार नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला म्हणून विरोधी पक्षांतील खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने सुरू केली होती. या दरम्यान तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करण्यास सुरुवात केली. त्यांची नक्कल पाहून येथे उपस्थित असलेले खासदार मोठमोठ्याने हसत होते. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी स्वतः मोबाइलमध्ये व्हिडिओ काढत होते. या प्रकारावर उपराष्ट्रपती धनखड यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Mukul Roy : यापुढे TMC शी माझा संबंध नाही, मी पुन्हा भाजपमध्ये

संसदेतील घुसखोरी प्रकरणात विरोधकांकडून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी वक्तव्य करावे अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठीच संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे 14 डिसेंबर रोजी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभेत काही खासदारांना निलंबित करण्यात आले. आतापर्यंत दोन्ही सभागृहांतील एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित खासदारांना संसदेच्या परिसरातही नो एन्ट्री 

लोकसभा सचिवालयाकडून आता एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या 49 खासदारांना संसदेच्या परिसरात देखील प्रवेश मिळणार नाही. यामध्ये संसद कक्ष, प्रेक्षक गॅलरी आणि लॉबीमध्ये देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांना संसद परिसरात देखील जाता येणार नाही.

MPs Suspended : निलंबनानंतर खासदारांना संसद परिसरातही नो एन्ट्री! लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube