तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका

तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका

Parliament Monsoon Session Derek O Brien Suspended : राज्यसभेत आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. आज राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार वाद झाले. या वादामुळेच त्यांना उर्वरित अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. पियुष गोयल यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

आज राज्यसभेत विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी करत होते. त्यावर पियुष गोयल म्हणाले की गृहमंत्री कुठे आहेत ते मी पाहतो. आम्ही 12 वाजता चर्चेसाठी तयार आहोत. विरोधी सदस्यांनी 267 अन्वये चर्चेच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. पण अध्यक्षांनी त्यावेळी चर्चेसाठी नकार दिला. त्यानंतर ओब्रायन आणि धनखड यांच्यात जोरदार वाद झाले. विरोधी सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. मात्र सत्ताधारी पक्षातील सदस्यांना कुठेही रोखले जात नाही, असे ओब्रायन म्हणाले.

त्यानंतर अध्यक्ष धनखड यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. पण, ओब्रायन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जोरात बोलणे सुरुच ठेवले. धनखड त्यांना वारंवार खाली बसण्यास सांगत होते मात्र, ओब्रायन यांनी अध्यक्षांच्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. यावेळी विरोधी पक्षांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. हा गोंधळ सुरू असतानाच पियुष गोयल यांनी ओब्रायन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर धनखड यांनी ओब्रायन यांनी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली.

2021 मध्येही केले होते निलंबित

अखेर त्यांच्या या वर्तनामु्ळे त्यांना निलंबित करण्यात आले. ओब्रायन यांना याआधी 2021 मध्येही असेच निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ नियम पुस्तक खुर्चीवर फेकून देत सभागृहातून वॉक आऊट केले होते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना त्यावेळच्या उर्वरित हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube