राजधानीत निर्भया’ची पुनरावृत्ती? वेळ विचारण्याच्या बहाण्याने महिलेला बसमध्ये ओढले, दोन तास चालत्या बसमध्ये अत्याचार

Delhi Crime वेळ विचारण्याच्या बहाण्याने बसमध्ये ओढण्यात आले आणि चालत्या बसमध्ये तिच्यावर सुमारे 2 तास अत्याचार करण्यात आला.

Untitled Design 20

Untitled Design 20

Woman raped in moving bus : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून हादरली आहे. एका खासगी बसमध्ये विवाहित महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी बसचा चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली आहे. 12 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. महिलेच्या तक्रारीनंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीनुसार पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टर या दोघांना ताब्यात घेतलं आणि पुढे त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे अत्याचारासाठी वापरण्यात आलेली बस पोलिसांनी जप्त केली असून तिची फॉरेन्सिक टापांनी सुरू करण्यात आली आहे. बसच्या आतील भागातून विविध नमुने गोळा करण्यात आले असून तांत्रिक पथक संपूर्ण वाहनांची बारकाईने तपासणी करत आहे. याशिवाय बसमधील तसेच रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. घटनेच्या वेळी बस कोणत्या मार्गावरून फिरत होती आणि त्या काळात बसमध्ये आणखी कोण उपस्थित होते, याचा शुद्ध पोलीस घेत आहेत.

1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींची सातत्याने चौकशी केली जात असून, या गुन्ह्यांमागे आणखी कोणी सहभागी होते का, याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील बस रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो या कंपनीची असल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हरियाणातीलफरिदाबाद येथील श्री हरी प्लाझा परिसरात असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून कंपनीच्या भूमिकेचा देखील तपास केला जात असल्याचे समजते.

या घटनेमुळे दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केली आहे. त्यांनी या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी करत म्हटले की, केले 30 वर्षीय महिलेला वेळ विचारण्याच्या बहाण्याने बसमध्ये ओढण्यात आले आणि चालत्या बसमध्ये तिच्यावर सुमारे 2 तास अत्याचार करण्यात आला. राणी बाग परिसरात ही बस तब्बल सात किलोमीटर फिरत होती, असा दावा देखील त्यांनी केला.

या प्रकरणामुळे राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई कारण्याचे आश्वासन दिले असून, तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील सर्व तथ्ये समोर येतील, असे सांगितले आहे.

Exit mobile version