Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत मांडलं आहे. त्याला बहुतेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. या विधेयकाच्या मांडणीनंतर सभागृहात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
Breaking! 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन; युजर्सच्या तक्रारी
महिलांबाबतच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ…
केंद्रीय कायदेमंत्री राम मेघवाल यांनी महिला सुरक्षा विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडले. तसेच राज्यसभेत देखील यावर चर्चा झाली. यावर पंतप्रधान देखील राज्यसभेत बोलले. त्यांच्या भाषणावर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर सभागृहात हशा पिकला. तर त्यांच्या आणखी एका वक्तव्याने मात्र सभागृहात गदारोळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
12 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चा जलवा! 900 कोटींचा टप्पा गाठला
महिला आरक्षण विधेयकावर खरगे म्हणाले की, ‘महिला आरक्षण विधेयकाचं श्रेय भाजप आम्हाला देत नाही. मात्र मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, महिला आरक्षण विधेयक 2010 मध्येच पारित करण्यात आलं होतं. मात्र ते आमलात आलं नव्हतं. तसेच ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीच्या महिलांचा साक्षरता दर कमी आहे. आणि याच कारणामुळे राजकीय पक्ष कमजोर महिलांना निवडतात. त्यात केवळ शिक्षित आणि ज्या निवडणूक लढू शकतात त्याच महिला असतात.’
खरगेंच्या कमजोर महिला या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ माजला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी त्यांना या वक्तव्यावर चांगलेच खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या की, आम्ही विरोधकांचा सन्मान करतो. मात्र हे वक्तव्य सर्व पक्षांच्या महिलांना असं बोलन स्विकारलं जाऊ शकत नाही. आमच्या पक्षाने आणि पंतप्रधान मोदींनी सशक्त केलं आहे.