Breaking! 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन; युजर्सच्या तक्रारी

Breaking! 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन; युजर्सच्या तक्रारी

मागील 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटर क्रॅश झाल्याने युजर्सकडून तक्रारी करण्यात येत आहेत. आज सकाळी 10 वाजता ट्विटर डाऊन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालं आहे.

शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप

वेबसाईटसह अॅप आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ट्विटर डाऊन झालं आहे. सोशल मीडियावरील एक प्रभावी माध्यम म्हणून ट्विटरची ओळख असून अचानक ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सला त्याचा फटका बसत आहे.

Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचं कौतुक; दिवगंत भाजप नेत्यांच्या आठवणींना उजाळा

ट्विटरवर पोस्ट शेअर केल्यास योग्य पद्धतीने अपलोड होत नसून, हीच समस्या सोमवारीदेखील अनेकांना आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता ही समस्या येत असून या समस्येचा फटका अनेकांना बसत असल्याचं एका युजर्सने तक्रारीत म्हटलं आहे.

Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ट्विटरने चिमणीचा फोटो हटवून आधी एका कुत्र्याचा लोगो दिला होता. मात्र, आता X असं चिन्ह देण्यात आलं आहे. ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी कमान हाती घेताच ट्विटरमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरचा वापर करण्यासाठी युजर्सकडून शुल्क आकारणार असल्याचे संकेत दिले होते.

शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप

मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीकडून अथवा एलन मस्क यांच्याकडून करण्यात आलेली नाही एकीकडे ट्विटरकडून शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे ट्विटर डाऊन होत असल्याच्या तक्ररी युजर्सकडून करण्यात येत आहेत.

एलन मस्क ट्विटरमध्ये काही बदल करत आहेत. मस्क यांनी पुन्हा एकदा ट्विटरमधील बदलांचे काही संकेत दिले आहेत. एलोन मस्क यांनी सांगितले की, भविष्यात X वापरणाऱ्या प्रत्येकाला ते वापरण्यासाठी थोडे मासिक शुल्क द्यावे लागेल. ट्विटरवर असणाऱ्या बनावट खात्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube