मोठी बातमी: केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी

Women Reservation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा या मध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा या विधेयकानुसार राखीव ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षणासह अनेक विधेयकांवर चर्चा जोरात सुरू […]

Breking 1

Breking 1

Women Reservation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा या मध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा या विधेयकानुसार राखीव ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षणासह अनेक विधेयकांवर चर्चा जोरात सुरू आहे. सोमवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेले काँग्रस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारकडे महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार महिला आरक्षण विधेयक आणू शकते, अशी अटकळ लावली जात होती.

मात्र, सरकारने याबाबत आपले पत्ते उघडलेले नाहीत. भारत राष्ट्र समिती (BRS) ने देखील महिला आरक्षण विधेयक आणण्याच्या मागणीसाठी लोकसभेत आणि बाहेर गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली होती. बीजेडीसह इतर अनेक राजकीय पक्षांनीही मागणी की, दीर्घकाळापासून महिला आरक्षणाची मागणी करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयक नवीन संसद भवनात मांडले जावे आणि मंजूर करावे, असे सांगितले होते. यामध्ये विलंब होता कामा नये.

Exit mobile version