Rahul Gandhi On PM Modi : स्वत: च्या राजकीय फायद्यासाठी भाजपने भारताचे परराष्ट्र धोरणात बदल करत भारताला आतून उद्ध्वस्त केल्याची टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच जेव्हा पर्यंत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजीनामा देणार नाही तोपर्यंत त्यांना झोप लागू देणार नाही असा इशारा देखील राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
‘रचनात्मक काँग्रेस’ (Rachnatmak Congress) या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही त्यांना आता झोपू देणार नाही. आम्ही त्यांना रात्रभर जागते ठेवू. जोपर्यंत ते कबूल करत नाहीत की, हे आमच्या हाताबाहेरचे आहे, आम्ही आता माघार घेत आहोत. तोपर्यंत आम्ही त्यांना झोपू देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. तसेच आपला देश प्रेमाचा आहे, द्वेष आणि हिंसेचा नाही असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकार लोकांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाही. हा लढा आदेश देणे आणि संवाद साधणे यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाही. मला वाटायचे की ही कदाचित एखादी रणनीती असावी पण एके दिवशी, जेव्हा मी त्यांच्यासोबत एका रुममध्ये बसलो होतो तेव्हा ते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोलू शकले नाहीत. तेव्हा मला समजले की पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत असेही या कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले.
तर मोदींना आजकल रात्री झोप येत नाही. याची अनेक कारणे आहेत. काही उघड आहेत तर काही छुपी आहेत. अमित शाह यांना चाणक्य म्हणतात पण ते गायब झाले. ते पळून गेले आणि 20 दिवस संसदेत उपस्थित राहू शकले नाहीत. आता या सरकारला जाणीव झाली आहे की, हा देश आपला आवाज उठवण्यापासून स्वत:ला थांबवणार नाही.
इनको हम पागल कर देंगे…
आजकल नरेंद्र मोदी रात में सोते नहीं हैं। इसके कई कारण हैं- कुछ obvious हैं, कुछ hidden।
अमित शाह को चाणक्य और न जाने क्या-क्या कहा जाता था, लेकिन वो गायब हो गए, वो भाग गए और 20 दिन तक संसद में नहीं आ पाए।
अब इस सरकार को समझ आ गया है कि ये देश अपने… pic.twitter.com/D1oQ5JFddB
— Congress (@INCIndia) August 13, 2026
पाकिस्तानने आपली जागा घेतली
तर या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणाावरुन देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. जेव्हा इराण आणि अमेरिकेत युद्ध झाला होता तेव्हा जर आपल्याकडे इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर आपल्याकडे एक मोठी संधी चालून आली असती.
कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात हजर ; शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी नोंदवला जबाब
इराण हा आपला जुना मित्र आहे. अमेरिका आणि रशिया देखील आपले मित्र असल्याने त्यांच्यात शांतता घडवून आणू शकलो असतो पण जे आपल्याला मिळायला हवे होते ते पाकिस्तानला मिळाले आणि नरेंद्र मोदी मात्र केवळ बघत राहिले.
