देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On Election : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा केला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 25T170858.319

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Election) यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी दिलेल्या 48 तासांच्या अल्टिमेटमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन आणि ‘जंतरमंतर 2.0’चा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले.

राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. देशातील विविध संस्थांच्या कामकाजावर सरकारचा प्रभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस यापूर्वी देण्यात आली होती, मात्र ती राज्यसभा सभापतींनी फेटाळल्याचा उल्लेख करत आता अशी कारवाई रोखता येणार नसल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने संबंधित प्रक्रियांना प्रशासकीय स्वरूपाच्या चर्चा आणि अभिप्रायाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं

यावेळी राऊत यांनी 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा केला. राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता समोर आणण्यासाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. राऊत यांनी देशातील राजकीय विरोधकांबाबत आक्रमक भाष्य करत सरकारविरोधातील लढा पुढे नेण्याची भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यांदरम्यान निवडणूक आयोग आणि विशेष सघन पुनरावलोकन म्हणजेच SIR प्रक्रियेवर देशभरात राजकीय वाद सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरूनही राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि दुष्काळ निवारणाला राजकीय कार्यक्रमाचं स्वरूप देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळाला, याचाही आढावा घेण्याची गरज असल्याचं राऊत म्हणाले. राज्य सरकारकडून मात्र दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि मदत उपाययोजनांबाबत प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

follow us