Video : इंधन बचतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; शाळा-कॉलेज ऑनलाईन तर, मंडे मेट्रो डे

Save Fuel PM मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर अनेक राज्यांची कठोर नियमावली बनवण्यास सुरूवात केली आहे.

Letsupp Image   2026 05 14T161528.878

Letsupp Image 2026 05 14T161528.878

Two Day WFH, No Car Day, Online Meets After PM’s Save Fuel Appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर अनेक राज्यांची कठोर नियमावली बनवण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर आता इंधन बचतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस वर्क फ्रॉम होम देण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांना ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, जर सोमवार हा मेट्रो डे असेल अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे. सरकार खासगी कंपन्यांनाही दोन दिवस घरून काम करण्याचे आवाहन करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी सरकार सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही स्तरांवर काम करत आहे. यासाठी ‘मेरा भारत मेरा योगदान’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचं ‘मिशन काटकसर’! मंत्र्यांच्या ताफ्यापासून ते कॅन्टीनच्या मेन्यूपर्यंत नियमावली जाहीर

अधिकाऱ्यांच्या पेट्रोल भत्त्यात 20 टक्क्यांची कपात

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, दिल्ली सरकारी अधिकाऱ्यांच्या पेट्रोल आणि डिझेल भत्त्यात 20 टक्क्यांनी कपात केली जाईल. प्रत्येक सोमवार हा ‘सोमवार मेट्रो दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, म्हणजेच अधिकारी आणि कर्मचारी मेट्रोने कार्यालयात प्रवास करतील. दिल्लीतील सर्व सरकारी वसाहतींमध्ये मेट्रो स्टेशनपर्यंत धावण्यासाठी अठ्ठावन्न बसेस तैनात केल्या जातील.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्गांसाठी आवाहन

याव्यतिरिक्त, दिल्ली सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. तसेच दिल्ली सरकार सहा महिन्यांसाठी पेट्रोल, डिझेल किंवा ईव्ही (EV) वाहने खरेदी करणार नसल्याचेही यावेळी रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले.  

एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित

इंधन बचतीसाठी कोणते निर्णय घेण्यात आले?

दिल्ली सरकारी कार्यालये आता सकाळी १०:३० ते सायंकाळी ७:०० पर्यंत उघडी राहतील. दरम्यान, एमसीडी कार्यालये सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत कार्यरत राहतील. दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस घरून काम करणे (WFH) बंधनकारक करण्यात आले आहे. वर्क फ्रॉम होम लागू करण्यासाठी सरकारकडून खासगी कंपन्यांनाही अशीच सूचना जारी केली जाईल. शासनाच्या ५० टक्के शासकीय बैठका आता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच घेतल्या जातील. Two Day WFH, No Car Day, Online Meets After PM’s Save Fuel Appeal

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारला “मेट्रो सोमवार” म्हणून घोषित करण्यात आले असून, लोकांना मेट्रो वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी मेट्रोने प्रवास करतील. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या वसाहतींमधून मेट्रो स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या वसाहतीबाहेर ५८ बसेस उभ्या केल्या जातील.कामावर येण्या-जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात १०% वाढ दिली जाईल. शासकीय वसाहतींमधील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी २९ वसाहतींमध्ये ५८ फिडर बस चालवल्या जातील. जनतेला आठवड्यातून किमान एक दिवस ‘वाहनबंदी दिवस’ पाळण्याचे आणि मालवाहतुकीसाठी ट्रकऐवजी रेल्वेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत किती टन सोने आयात करतो, किती पैसे मोजतो ? आकडा धक्कादायक !

परदेश प्रवासावर बंदी

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कडक सूचना दिल्या आहेत की, दिल्ली सरकारचा कोणताही मंत्री किंवा अधिकारी पुढील एक वर्षासाठी कोणताही अधिकृत परदेश दौरा करणार नाही. सर्वसामान्य जनतेलाही आपला परदेश प्रवास मर्यादित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विजेचा वापर नियंत्रित करण्यासाठी, शासकीय कार्यालयांमध्ये एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. विजेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक कॉरिडॉरमध्ये ‘मास्टर स्विच’ बसवण्यात येणार असून, न्यायालयांना अधिकाधिक ऑनलाइन सुनावण्या घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
Exit mobile version