Download App

भारताचा चीनी नागरिकांसाठी मोठा निर्णय, पाच वर्षांनंतर मिळणार व्हिसा; उद्यापासून कार्यवाही सुरू

भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी पर्यटक (Chinese Citizens) व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.

Indian Visa For Chinese Citizens : तब्बल पाच वर्षांनंतर चीनी नागरिकांसाठी भारताने मोठा निर्णय (Indian Visa) घेतला आहे. भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी पर्यटक (Chinese Citizens) व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे. व्हिसाची प्रक्रिया उद्यापासून (24 जुलै) सुरू होणार आहे. चीनची राजधानी बीजिंग येथील भारतीय दूतावासाने सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. मार्च 2020 मध्ये कोरोना संकटादरम्यान (Corona Pandemic) भारताने सर्व पर्यटक व्हिसा निलंबित केले होते. तेव्हापासून चीनी नागरिकांसाठी (Tourist Visa) व्हिसा सेवा बंद होती.

व्हिसासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

दूतावाासाने स्पष्टपणे सांगितले आहे की बीजिंग येथील भारतीय व्हिसा केंद्रात (India China Relation) अर्ज केल्यानंतर पासपोर्ट विदड्रॉल लेटर बंधनकारक राहील. कोविड 19 महामारी आणि जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेला भारत चीन यांच्यातील संघर्ष. या कारणांमुळे दोन्ही देशांतील प्रवास आणि संपर्क जवळपास बंदच होता. मागील काही वर्षांपासून चीनने भारतीय विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना व्हिसा देणे सुरू केले होते. परंतु, प्रवासावर बंदी कायम होती.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू, प्यू रिसर्चच्या अहवालात धक्कादायक खुलासा 

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर परिस्थिती चिघळली

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांतील संबंध अतिशय खराब झाले होते. नंतरच्या काळात कुटनिती आणि सैन्य चर्चांच्या माध्यमातून तणावग्रस्त भागांतून सैन्य मागे हटले होते. ऑक्टोबर 2024 मध्ये देपसांग आणि डेमचोक या भागांतून सैन्य हटवण्यावर करार झाला. या कराराच्या काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या (Xi Jinping) दोन्ही नेत्यांची रशियातील कझान येथे बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते.

आता भारत आणि चीन दोन्ही देशांना वाटतंय की लोकांमध्ये संपर्क वाढला पाहिजे. यासाठी विमान सेवा सुरू करणे आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. ही यात्रा कोरोनामुळे बंद करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की भारत आणि चीन यांच्यातील संबंध हळूहळू योग्य दिशेने सुधारत आहेत.

अमेरिका-चीनला शह देण्याची तयारी, PM मोदींचा ब्रिटन अन् मालदीव 4 दिवसांचा दौरा ठरला

follow us