Wrestlers Protest : भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Wrestler Vinesh Phogat) आता नवीनच एक कविता पोस्ट केली आहे.
विनेश फोगाटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या कवितेचा फोटो शेअर (Share photos) केला आहे. तसेच या कवितेच्या कॅप्शनमध्ये तिने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
#WeWantJustice 🙏 pic.twitter.com/Vf1dQnT7hH
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) June 16, 2023
विनेश फोगाटने शेअर केलेली कविता नेमकी काय आहे?
सुनो द्रौपदी, शस्त्र उठा लो,
अब गोविंद ना आएंगे
छोडे मेहंदी, खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाए बैठे शकुनी
मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो,
अब गोविंद ना आएंगे
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. We Want Justice असं म्हणत विनेश फोगाटने ही पूर्ण कविता पोस्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी १५ जून रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील (POCSO ) पोक्सो अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.
दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टामध्ये अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल करण्यात आला आहे. ४ जुलै दिवशी न्यायालय रद्द अहवालावर पुन्हा सुनावणी करणार आहे. तसेच बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ६ प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. यासाठी न्यायालयाने २२ जूनची तारीख निश्चित केली आहे.
त्यादिवशी सुनावणी पार पडणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह शरण यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यावर आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक हिने प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, या संपूर्ण प्रकरणावर आरोपपत्र दाखल होण्याची आम्ही वाट बघत आहोत. त्यानंतर आम्ही काही बोलू शकणार नाही. आता विनेश फोगाटने या सगळ्या परिस्थितीला चांगलीच कविता पोस्ट केली आहे.