Download App

Wrestlers Protest : न्यायासाठी नोकरी अडथळा असेल तर… कुस्तीपटू बजरंग पुनियाने ठणकावून सांगितलं

Wrestlers Protest : आमच्या पदकांची किंमत 15-15 रुपये सांगणार आता आमच्या नोकरीच्या मागे आहेत, आम्हाला न्यायासाठी नोकरी अडथळा ठरत असेल तर सोडायला दहा सेकंदही लागणार नसल्याचं कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajran Puniya) स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील ट्विट पुनियाने केलं आहे. या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. (Wrestler Bajrang Punia said boldly It will not take ten seconds for us to leave if the job becomes an obstacle to justice)

यासोबतच पुनियाने कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातलं कुस्तीपटूंच आंदोलन मागे घेतल्याचं वृत्तही फेटाळून लावलं आहे. आम्ही आंदोलन मागे घेतल्याच्या बातम्या अफवा आहेत.

‘मुंगेरीलाला के हसीन सपने’; बॅनरबाजीवरून मुनगंटीवारांनी उडवली पटोलेंची खिल्ली

कुस्तीपटूंचं नूकसान करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. आम्ही ना आंदोलन मागे घेतलं ना मागे हटलो, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार असल्याचं पुनियाने स्पष्ट केलं आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विघ्नेश फोगट हे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे प्रमुख चेहरे आहेत. हे तिन्ही कुस्तीपटू रेल्वेत नोकरीवर परतले आहेत.

कुस्तीपटू पुन्हा नोकरीवर परतल्याने आंदोलनातून मागे हटल्याच्या बातम्यांना वाव आला आहे. यामध्ये विशेषत: साक्षी मलिकचे नाव सर्वात आधी पुढे आले होते. आंदोलन मागे घेतल्याचं वृत्त साक्षीनेही फेटाळून लावत आम्ही न्यायाच्या लढाईत कुणीही मागे हटलेलो नाही अन् हटणारही नसल्याचं तिने ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका, साक्षी, बजरंग आणि विनेश रेल्वेत नोकरीवर परतले आहेत, पण न्यायासाठी त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुस्तीपटूंच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भारताच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. जंतरमंतर येथील आंदोलन पोलिसांनी मोडून काढल्यानंतर कुस्तीपटू अधिकच आक्रमक झाले आहेत.

आता त्यांनी आरपारची लढायची करायचं ठरवलं. त्यांनी सरकारचा निषेध म्हणून त्यांनी जागतिक स्तरावर जिंकलेली पदके नदीत फेकून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंशी चर्चा केली. या आंदोलनातील तिन्ही प्रमुख चेहरे पुन्हा नोकरीवर रुजू झाल्याने आंदोलन मागे घेतलं काय? असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, आता साक्षी, विघ्नेश, बजरंगने आपली भूमिका स्पष्ट करीत न्यायासाठी नोकरी सोडणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

Tags

follow us