Pharmacy Student Wrote Jai Shriram : वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात परीक्षा कशा घेतल्या जातात आणि पेपरचे मूल्यमापन कसं होतं हे माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. येथे फार्मसीच्या प्रथम वर्षाचे चार विद्यार्थी त्यांच्या पेपरमध्ये “जय श्री राम” आणि भारतीय क्रिकेटपटूंची नावं लिहून 56 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले असल्याचं गजब प्रकरण समोर आलं आहे. (Jai Shriram) ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली. आता परीक्षा समितीने या प्रकरणी डॉ. आशुतोष गुप्ता आणि डॉ. विनय वर्मा या दोन शिक्षकांना दोषी ठलवल आहे. त्यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्याविरोधात राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
कॉपीमध्ये लिहलं ‘जय श्रीराम’
पूर्वांचल विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या डी. फार्म’च्या प्रथम आणि द्वितीय सत्राच्या परीक्षेत चुकीचं मूल्यांकन करून आणि प्रश्नाची योग्य उत्तर न लिहताही दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी दिव्यांशू सिंह यांनी माहिती अधिकारांतर्गत याप्रकरणी माहिती मागवली होती. 3 ऑगस्ट 2023 रोजी, दिव्यांशु सिंग यांनी डी. फार्म’च्या प्रथम वर्षाच्या 18 विद्यार्थ्यांचे रोल नंबर दिले होते. त्यानंतर त्यांच्या पेपरच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी केली होती.
राज्यपालांकडे प्रकरण पाठवलं
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, बारकोड क्रमांक 4149113 च्या कॉपीमध्ये विद्यार्थ्याने “जय श्री राम पास” असं लिहिलं होतं. याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आदी भारतीय खेळाडूंची नावं लिहिली होती. हा विद्यार्थी 75 पैकी 42 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. असाच दुसरा एक प्रकार समोर आला. बारकोड क्रमांक 4149154, 4149158, 4149217 च्या प्रतींमध्ये देखील आढळून आला. त्यानंतर दिव्यांशी यांनी राजभवनाला पत्र पाठवून एका प्राध्यापकाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यपालांकडे या प्रकरणाची दखल घेतली आणि 21 डिसेंबर 2023 रोजी चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले.
तपास समितीत आरोप खरे ठरले
राजभवनाच्या आदेशानंतर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली असून, तक्रार खरी असल्याचं निष्पन्न झालं आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांमध्ये 80 पैकी 50 पेक्षा जास्त गुण देण्यात आले. त्यांचे पेपर पुनर्तपासणीसाठी पाठवले असता दोन्ही बाह्य परीक्षकांनी शून्य गुण दिले. याप्रकरणी कुलगुरू प्रा.वंदना सिंह यांनी सांगितलं की, फार्मसी इन्स्टिट्यूटचे दोन प्राध्यापक चुकीच्या मूल्यांकनात दोषी आढळले आहेत. या दोघांनाही कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.