Sivananda Baba passes away : योगगुरू शिवानंद बाबा (Sivananda Baba) यांचे निधन झाले आहे. वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर (Harishchandra Ghat in Varanasi) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाराणसीमध्ये १२८ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
मोठा निर्णय! राज्यातील ‘या’ 65 तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार; कार्यवाही सुरू
शिवानंद बाबा यांचे शनिवारी रात्री ८.४५ वाजता निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर बीएचयूमध्ये उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शिवानंद बाबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. योगसाधक आणि काशी निवासी शिवानंद बाबा यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. योग आणि साधनेला समर्पित त्यांचे जीवन देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं मोदी म्हणाले.
योगगुरु बाबा शिवानंद यांचे निधन, वयाच्या १२८ व्या वर्षी मालवली प्राणज्योत
योग साधनेतील शिवानंद बाबांचे योगदान पाहून २१ मार्च २०२२ रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचे भारतातच नव्हे तर परदेशातही अनुयायी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शिवानंद बाबांच्या योगाभ्यासाचे अनुयायी होते. दरम्यान, शिवानंद बाबा यांच्या निधनामुळे वाराणसीमध्ये शोककळा पसरली आहे.
शिवानंद बाबांचे पार्थिव दर्शनासाठी दुर्गाकंड येथील आश्रमात ठेवण्यात येईल. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील.
शिवानंद बाबा यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी पश्चिम बंगालमधील श्रीहट्टी येथे झाला. त्यांच्या घराची परिस्थिती बिकट होती. शिवानंद बाबांचे आईवडील भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते. जेव्हा शिवानंद बाबा चार वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना नवद्वीपचे बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्या हवाली केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माचे धडे गिरवले आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळले. बाबा शिवानंद यांनी आयुष्यभर योगाभ्यास केला.
ते कुठेही राहत असले तरी, निवडणुकीच्या दिवशी वाराणसीला येऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास शिवानंद बाबा कधीही विसरत नाहीत.
यावर्षी ते कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला आले होते. त्यांनी महाकुंभात पवित्र स्नानही केले होते. त्यांची सकाळ पहाटे तीन किंवा चार वाजता सुरू होत असे. स्नान केल्यानंतर ते ध्यान आणि योगा करत.