International Yoga Day : योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. योग हे स्वतःसोबत आणि जगासोबत शांततेत कसं वागायचं हे शिकवत, असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. पंतप्रधान मोदी दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या आमंत्रणानंतर मोदी सहाव्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहेत.
Delighted to take part in the #YogaDay programme at @UN HQ. Let us make Yoga a part of our lives and further wellness. https://t.co/XvsB8AYfGs
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2023
पंतप्रधान मोदी म्हणाले, योग म्हणजे संघटित व्हा. हे पेटंट, कॉपीराइट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे. प्रत्येकजण ते करू शकतो. अमेरिकेकडे 21 जून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा म्हणून प्रस्ताव ठेवला होता. हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण जग आज भारतासोबत आलं आहे. योग हा भारतातून आला असून ही भारताची जुनी संस्कृती असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.
Deepak Kesarkar : ‘….तर एकनाथ शिंदेनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती’
यावेळी बोलतनात जनतेला संबोधित करताना मोदींनी योगाचं महत्व समजावून सांगितलं आहे. ते म्हणाले, तुम्ही कुठेही योगा करू शकता. योग लवचिक असून सर्व देशांच्या संस्कृतींसाठी आहे. योग हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. योग हे स्वतःसोबत आणि जगासोबत शांततेत कसे राहायचे हे शिकवत, असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट : आडवाणींचा दाखला देत ठाकरे म्हणाले, ‘जाऊ द्या हो…’
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मोदी यांच्यासाठी उद्या सरकारी स्नेहभोजनही ठेवण्यात आलंय. त्याशिवाय इतर कार्यक्रमही दौऱ्यात असणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=p3qC3_dk4Uo
दरम्यान, या दौऱ्याची विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय. त्याच संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आज मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस पार पडला.