प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट : आडवाणींचा दाखला देत ठाकरे म्हणाले, ‘जाऊ द्या हो…’

प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट : आडवाणींचा दाखला देत ठाकरे म्हणाले, ‘जाऊ द्या हो…’

Uddhva Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तेव्हा त्यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी जाऊ द्या हो असं उत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray answered on Prakash Aambedkar Meet Aurahjeb Tomb )

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक

यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, ज्या प्रमाणे भाजप-शिवसनेची युती असताना लालकृष्ण आडवाणी यांनी देखील मोहम्मद अली जिना यांच्या कबरीवर नतमस्तक झाले होता. तर नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला आपले पंतप्रधान गेले होते. त्यामुळे आता स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. लोकांनी इतिहासात गुंतवून ठेवायचं, प्रत्येकवेळी निवडणुकीत चेहरा नसेल तर कधी बजरंगबली कधी दाऊदच्या कधी औरंजेबाच्या वादवरून दंगल कारायची. औरंगजेबाचच्या नावावरून दंगल करणारे हे औरदंगाबाद आहेत. कारण यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार कारायचे आहेत.अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

‘आता त्यांना आनंद घेऊ द्या मी व्यत्यय आणणार नाही पण, वेळ आल्यावर’.. विखेंचा थोरातांना इशारा

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली आहे. असा आरोप केला आहे. तर यावेळी त्यांनी याविरोधात मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं.या मोर्चाबद्दल सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात, त्याला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी, येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. त्याचं नेतृत्व शिवसेना नेते आणि आदित्य करेल.

पुढे ते असं देखील म्हणाले की, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडली. ते पैसे पलिकेचे नव्हते. त्या ठेवी होत्या. त्यातून आम्ही विविध विकस काम केली. त्यात कोस्टल रोड, जनत्ची काम केली गेली. आता मात्र कोणत्याही कारणांसाठी हा जनतेची पैसै वापरला जात आहे. असा आरोप ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube