Download App

अतिकने ताब्यात घेतलेली संपत्ती पीडितांना परत मिळणार; योगी सरकारचा मोठा निर्णय

  • Written By: Last Updated:

Yogi Adityanath: माफिया अतिक अहमद याने अनेकांच्या घर, जमिनी बळकावल्या आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्ररफ यांची हत्या झाली आहे. त्यानंतर या जमिनी व घर मूळ मालकांना परत देण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

जमिनी व घर पीडित व्यक्तीला परत करण्यासाठी आयोगा स्थापन करण्यात येणार आहे. हा आयोग कायदेशीर मार्गाचा वापर करून मूळ मालकांना त्यांची संपत्ती परत करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत पीडित व्यक्ती करत आहे. प्रयागराज येथील झाल्वा येथील रहिवासी जयश्री व उर्फ सूरज कली हिची संपत्तीवर अतिक कब्जा केला होता. या महिलने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट निघाले, 15 दिवसांतच सरकार’.. राऊतांचा खळबळजनक दावा !

ही महिला म्हणाले, गेल्या 35 वर्षांपासून मी अतिक अहमदविरोधात लढत आहेत. माझ्याकडे वडिलोपार्जित साडेबारा एकर जमीन होती. त्या जमिनीवर माफिया अतिकने ताबा घेतला. त्यानंतर 1989 मध्ये माझे पती ब्रिजमोहन उर्फ ​​बच्चा कुशवाह हे बेपत्ता झाले. त्यांचा आजपर्यंत कोणीही शोध लावला नाही. परंतु आता मुख्यमंत्री योगींच्या निर्णयामुळे मला माझी मालमत्ता परत मिळणार आहे.

माफिया व माजी खासदार अतिक अहमद याची यूपीमध्ये दहशत होती. तो लोकांच्या जमिनी बळकवत होता. त्यासाठी तो बंदुकींचा वापर करत होते. आपल्या गुंड पाठवून जमिन मालकांना बंदुकींचा धाक दाखवत होता. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून घेत आणि आपण जमिनीचे मालक असल्याचे सांगत होता.

अतिक अहमद आणि त्याच्या गुंडांच्या धमक्यामुळे अनेकांनी घर, जमिने सोडून दिले होते. महसूल आणि पोलिसांकडून तक्रार करून काही होत नव्हते, अशा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. अतिक अहमदची संपत्ती ही 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. ही सर्व संपत्ती बेनामी आहे. खासदारकीच्या निवडणुकीत अतिकने केवळ 25 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.

Tags

follow us