Download App

तुम्हीच कानडी बोला, मी हिंदी बोलणार नाही; कर्नाटकात रिक्षाचालकाची दादागिरी

तुम्ही कानडी बोला, मी का हिंदी बोलू, हे कर्नाटक आहे, आमची भूमी आहे. आम्ही हिंदी बोलणार नाही, या शब्दांत कर्नाटकातील एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला. प्रवासी आणि रिक्षाचालकाचा व्हिडिओ समामाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक

या व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला कानडी भाषेत संभाषण करण्यासाठी बोलत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडून महिला हिंदी बोलण्यासाठी त्याला आग्रह करत असल्याचं दिसून येत आहे.

काळ्या कटआऊटमध्ये दीपिकाचा हटके लूक…

ही प्रवासी महिला रिक्षातून खाली उतरते. महिला रिक्षातून खाली उतरल्यानंतरही रिक्षाचालकाला त्याचा राग अनावर न झाल्याचं दिसून येत आहे. यावरुन मातृभाषेवर त्यांच किती प्रेम आहे हे स्पष्ट होत आहे.

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंना धक्का, सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश

एकंदरीत दोघांच्या संभाषणातून आपल्या मातृभाषेवरुन वाद होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातील अनेक लोकं आपल्याला जी भाषा सोयीस्कर वाटेल त्या भाषेत संभाषण करीत असतात. राज्यातील अनेक भागांत हिंदी भाषेतूनच संभाषण होत असतं, अर्थात हिंदी राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वांना अवगतच आहे.

Shirdi Lok Sabha Constituency : आठवलेंना व्हायचंय शिर्डीचा खासदार | LetsUpp Marathi

मात्र, दक्षिण भारतात काही लोकांना आपल्या मातृभाषेबद्दल खूपच प्रेम असल्याचं दिसून आलं आहे. असे लोकं आपली भाषा संस्कृती सोडण्याच नावही घेत नाहीत. त्यांना हिंदी बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणाऱ्यांचा विरोध करतात. दरम्यान, सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tags

follow us