मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक

मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक

मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाचा मृत्यू आहे. आग एवढी भयंकर होती की स्थानिकांना संसार उपयोगी साहित्य वाचवता आले नाही. त्यामुळे आगीत अनेकांचे संसार जळून खाक झाले आहेत. गेल्या काही तासांपासून अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या आगीत लाखोंचे सामान जळून गेले आहे. जखमी आणि बेपत्ता व्यक्तींची चौकशी सुरू आहे. 800-1000 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

आठवलेंना व्हायचंय शिर्डीचा खासदार

अग्निशमन दल वेळेवर आले असते तर आग लवकर अटोक्यात आली असती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मोठी झोपडपट्टी असल्यामुळे आग वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घरातील गॅस सिलेंडरसह मोकळ्या जागेत धाव घेतली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

यापूर्वी मुंबईतील (Mumbai fire) ओशिवरा फर्निचर मार्केटला आग लागली होती. ज्यामध्ये अनेक दुकाने जळून खाक झाली. या भागात बहुतांश दकानं फर्निचर, काचेची दुकानं आणि गोदामं होती. या आगीत 300 चे 400 दुकाने जळाल्यांची माहिती स्थानिकांनी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube