Download App

झारखंडचा दिग्गज नेता हरपला! दोन दिवसांचा दुखवटा जाहीर…

झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचे आज निधन झालं. चेन्नईमधील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. जगरनाथ महतो गिरीडीह जिल्ह्यातील डुमरी मतदारसंघाचे आमदार होते.

Pankaja Munde : माझ्यावर दारुवाली बाई म्हणून टीका; फडणवीसांवर झालेल्या टीकेमुळे ते व्यथित होणार नाहीत

दरम्यान, आमदार जगरनाथ महतो यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून झारखंड सरकारकडून दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

बॉलिवूडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी! राजश्री प्रोडक्शनची सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्यांसह हातमिळवणी

2020 साली त्यांना कोरोनाने विळखा घातला होता. त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढल्याने त्यांच्या फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करावं लागलं होतं. कोरोना झाल्यानंतर महतो यांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर ते कायमच आजारी पडत असत.

वडगाव शेरीच्या विकासात योगदान शून्य आता उपोषणाची स्टंटबाजी; मुळीकांचा टिंगरेंना टोला

झारखंडचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यावेळी त्यांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात सौम्य संसर्गाची लक्षणे आढळून आली होती.

त्यानंतर त्यांना रात्री एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना एमजीएम चेन्नई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, गुरूवारी उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Tags

follow us