Download App

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 वी उत्तीर्णांसह पदवीधरांनाही दरमहा पगार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना लागू केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरुरमध्ये बोलताना तरुणांसाठीही घोषणा केली.

  • Written By: Last Updated:

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. (Eknath Shinde ) १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये. तसंच, पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. (Ladaki Bahin) एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशी दिनानिमित्त ही घोषणा केली आहे.

बेरोजगारीमध्ये घट मोठी बातमी! ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचं जहाज उलटलं, 13 भारतीयांसह 16 लोकांचा क्रू बेपत्ता

सरकारने राज्यात नुकतीच लाडकी बहीण योजना आणली आहे. पण, राज्यातील लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विरोधक विचारत होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी मोठी घोषणा केली आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच, यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

वर्षभर अप्रेन्टिसशिप 

१२ वी पास असणाऱ्याला ६ हजार, डिप्लोपा झालेल्याला ८ हजार तर पदवी केलेल्या तरुणाला १० हजार असं दर महिन्याला मिळणार आहेत. वर्षभर अप्रेन्टिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळतील. यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल. या अनुभवाच्या जोरावर त्याला कुठेही नोकरी मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले.ॉ

लाडका भाऊ शेतकरी सुखी राहू दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं, नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला पुजेचा मान

सरकारचा कुशल कामगार तयार करण्यावर भर आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल. अप्रेन्टिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा स्टायपंड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. महायुती सरकार गरिबांचं आहे. लाडक्या बहीणसह, भाऊ देखील लाडके आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

विद्यार्थ्यांना पैस मिळतील

इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या सरकारने अशाप्रकारची योजना आणलेली आहे. तरुण कारखान्यात काम करत असताना सरकार त्यांना अप्रेन्टिसशिपसाठी स्टायपंड देणार आहे. बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. विद्यार्थ्यांना पैस मिळतील आणि अप्रेन्टिसशिप करता येईल. यातून त्यांना अनुभव मिळेल. त्यामुळे यातून त्यांना नोकरी मिळण्यास सोपं जाईल, असंही शिंदे म्हणाले आहेत.

follow us