शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर यांच्यासाठी लाडक्या बहिणी मैदानात; प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद

शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून, ‘लाडक्या बहिणींकडून’ मोठ्या उत्साहात स्वागत.

  • Written By: Published:
Untitled Design (223)

Beloved sisters in the fray for Shiv Sena candidate Sandeep Lonkar : राम-लक्ष्मणाच्या वेशभूषेतील कलावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी असलेले ‘लाडका भाऊ’चे फलक, तसेच ध्वनीवर्धकावर सुरू असलेले उत्साहवर्धक संगीत यामुळे प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक – केशवनगर, साडेसतरानळी, शेवाळेवाडी परिसरात वातावरण पूर्णतः प्रचारमय झाले आहे. शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून, ठिकठिकाणी ‘लाडक्या बहिणींकडून’ मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले जात आहे.

हे भारावून टाकणारे स्वागत पाहून आपल्या विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उमेदवार संदीप लोणकर यांनी व्यक्त केली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांचा थेट संवाद, महिलांचा सहभाग आणि तरुणांचा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांच्या प्रचारार्थ मांजरी बुद्रुक येथील महादेवनगर घुले वस्ती परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवकांनी पदयात्रेत सहभाग घेत प्रचाराला अधिक बळ दिले.

फेसबुक लाइव्हमध्ये जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावेळी बोलताना संदीप लोणकर म्हणाले की, “प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. लाडक्या बहिणींसह सर्व मतदारांनी मला एकदा महापालिकेत काम करण्याची संधी द्यावी. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.” या पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, सागर घुले, अमोल मोरे, कुणाल मोरे, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ आण्णा, तेजस गायकवाड, आनंद मोरे, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड, गौरीशंकर घुले, देविदास जगताप, समीर मोरे, अनिकेत गोरे, विक्रांत होरटे, विशाल करके, सुमित बोबडे, विशाल सूर्यवंशी, विजय कदम, साहिल भंडारी, ओम कांबळे आदींचा समावेश होता.

एकूणच, मांजरी बुद्रुक – केशवनगर परिसरात शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद आगामी निवडणुकीत रंगत वाढवणारा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

follow us