Download App

विधानसभेची तयारी सुरू! आमचे 180 आमदार निवडून येणार, जयंत पाटलांचा कॉन्फिडन्स वाढला

आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.

Jayant Patil On Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) मविआने महायुतीचा धुव्वा उडवला. 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या. 10 उमेदवार रिंगणात उतरवलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.

बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंचं पुणे शहरात जंगी स्वागत; अजितदादांबद्दल म्हणाल्या, मी… 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळं आमच 10 पैकी आठ उमेदवार निवडणून आले. आमचा 80 टक्के स्ट्राईक रेट राहिला. आम्ही आणखी दोन लढल्या असत्या तर आम्हाला अधिक जागा मिळाल्या असत्या. आमची अपेक्षा आहे की, विधानसभेला आमचे 180 हून अधिक आमदार निवडून येतील, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात मराठा खासदरांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त, बबनराव तायडेंनी सांगितली आकडेवारी 

अनेक आमदार परतीच्या वाटेवर
पुढं बोलतांना पाटील म्हणाले, बारामतीत सुप्रियाताई सुळे यांना 48 हजारांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. अनेक नेते, आमदार, मंत्री सांगत आहेत, आम्हाला परत पवार साहेबांसोबत काम करायचे आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होतोय, असं पाटील म्हणाले.

भाजपच्या वाट्याला आलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी मला जबाबदारीतून मुक्त करा असं म्हटलं. त्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी उद्विग्न होऊन असं विधान का केलं माहिती नाही. फडणवीस यांनी लोकसभेसाठी पूर्णपणे मेहनत घेतली होती. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनता पक्ष फोडाफोडी, महागाई, बेरोजगारीने त्रस्त होती. त्यामुळं जनतेनं भाजपच्या विरुध्द कौल दिल्याचं जयंत पाटील म्हणाले.

follow us