मोठी बातमी : ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; टीएमसीच्या 20 खासदारांचा एनडीएला पाठिंबा ?

TMC: पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 टीएमसी खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे

Mamta Banrjee 1

Mamta Banrjee 1

20 TMC MPs write to Speaker backing NDA: सत्तेतून पायउतार झालेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) फूटला आहे. आमदारापाठोपाठ आता खासदारांनी ममतादिदींची साथ सोडली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 टीएमसी खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दस्तीदार यांनाचा माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

काकोली घोष दस्तीदार यांनी पीटीआयशी बोलताना हा दावा केला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून या गटाने एनडीएला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्यासह जवळपास वीस टीएमसी खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे, काकोली घोष दस्तीदार यांनी स्पष्ट केले आहे. आपण अद्याप लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद (Chief Whip) पदावर असल्याचा दावा करत घोष दस्तीदार यांनी सांगितले की, हा निर्णय इतर खासदारांशी सविस्तर चर्चा करून घेण्यात आला आहे.

AI Minister : भारतात AI युगाची सुरुवात; केरळ मंत्रिमंडळात एआय मंत्र्यांची नियुक्ती


टीएमसीचे लोकसभेत 28 आणि राज्यसभेत 12 खासदार

सध्या टीएमसीचे लोकसभेत 28 आणि राज्यसभेत 12 खासदार आहेत. जवळपास 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी, बंडखोरी आणि वरिष्ठ नेत्यांच्या राजीनाम्यांमुळे अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा दावा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. घोष दस्तीदार यांनी सांगितले की, “जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. भविष्यातील आमची राजकीय वाटचाल एनडीएसोबत असावी, असे आम्हाला वाटते. टीएमसीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या दाव्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच भाजपनेही याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.


शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 719 अंकांनी घसरला; नेमकं कारण काय?


सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसी फोडली ?

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या उपस्थितीत टीएमसी खासदारांचे बैठक पडल्याचे सांगितले जात आहे. याआधी टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी दिल्लीत गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीत प्रसून बॅनर्जी, सताबडी रॉय, आणि जगदिश बसुनिया, यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

Exit mobile version