Download App

मतदारसंघात 300 कार्यकर्ते अन् वेळापत्रक; एनडीएच्या उमेदवारांसाठीचा खास प्लॅन तावडेंनी सांगितला

Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी दिली आहे.

विनोद तावडे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी 300 प्रमुख कार्यकर्ते सक्रिय राहणार आहेत. या कार्यकर्त्यांबरोबर बसून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 च्या निवडणुकीच्या निकाल लक्षात घेता मतमोजणीपासून आजपर्यंतचा एक उलटं वेळापत्रक बनवलं. यामध्ये काय असायला हवं, काय करणं गरजेचं आहे? याचा समावेश असल्याची माहिती तावडेंनी दिली आहे.

ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड, अनिल परबांनी थेट पुरावे दाखवले

तसेच भाजपच्या खास प्लॅननूसार लाभार्थ्यांना संपर्क कधी आणि कसा करायचा आहे. नवीन मतदार जे विशेषतः 21 व्या शतकात जन्मले आहेत, त्यांना संमेलनाच्या स्वरुपात एकत्र करुन २०१४ पूर्वीचा आणि २०१४ नंतरचा विकसित भारत याची माहिती कशी पोहोचवायची, याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील मतदारांपैकी मागासवर्गीय, दलित, आदिवासी, तरुण आणि महिला या सर्व घटकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल? याबाबत मोदी सरकारनं जे काम केलं आहे, याबाबतची रचना बनवण्यात आली असून आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी लढायची नाही पण पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाची कल्पना वास्तवात उतरवण्यासीठी ही निवडणूक जिंकणं गरजेचं असल्याचा कानमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या बैठकीत दिल्याचं विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us