ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड, अनिल परबांनी थेट पुरावे दाखवले
MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी केली आहे. निडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली. सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यांचा हा खोटेपणा जनेतच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, लोकांना काय झालं हे समजलं पाहिजे, अशी टीका करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी सर्व पुरावे दाखवले.
ते पुढं म्हणाले की शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात बाजू मांडत होते, त्यावेळी संपूर्ण देशाला वाटतं होतं की 16 गद्दार आमदार अपात्र होतील. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आपले मुद्दे अधोरेखित करत एक चौकट तयार करुन दिली होती. त्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निर्णय द्यावा असं सुचवलं होतं, असं अनिल परब यांनी म्हटलं.
ते पुढं म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निकालात दोन मुद्दे महत्त्वाचे होते. त्यापैकी एक अपात्रतेचा होता. हा मुद्दा घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार जे अपात्रतेला पात्र होतात त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. पण राहुल नार्वेकरांनी निकाल देताना आपण कसे सुप्रीम कोर्टापेक्षा कसं मोठे आहोत हे सिद्ध केलं. निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्षाची लढाई सुरु होती, त्यामध्ये जो निर्णय आला त्याचं वाचन राहुल नार्वेकरांनी केलं, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
शिवसेनेचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी निर्णय देताना आपल्याला अपात्र न करण्यासाठी काय निकष लावले आणि त्यांना अपात्र न करण्यासाठी काय निकष लावले हे बघितलं तर लक्षात येतं की खोटेपणा केला आहे, असे अनिल परब यांनी म्हटले.
सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला विधीमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही. मुळ राजकीय पक्ष, त्यांची घटना, संघटनेची रचना आणि इतर चाचण्यादेखील महत्त्वाच्या आहेत. घटना बघाताना पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत, पाच-पाच वर्षांनी तुमच्याकडे निवडणुका झाल्या आहेत का हे तापासून घेण्याची गरज होती, असे अनिल परब यांनी म्हटले.
राहुल नार्वेकरांनी मनाला येईल तसा कायद्याचा अर्थ काढला; असीम सरोदेंकडून निकालाची चिरफाड
नार्वेकरांनी सांगितले की 1999 नंतर आमच्याकडे कोणतेही रेकाॅर्ड नाही असं त्यांना निवडणूक आयोगाने सांगितले. त्या आधारवर नार्वेकरांनी आपलं नाव, चिन्ह आणि पक्ष काढून घेतला. निवडणूक आयोगाकडे आम्ही सर्व पुरावे दिले आहेत तरी देखील खोटेपणाने निकाल दिला जात असेल तर जनतेचे न्यायालय हाच पर्याय आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.