राहुल नार्वेकरांनी मनाला येईल तसा कायद्याचा अर्थ काढला; असीम सरोदेंकडून निकालाची चिरफाड
Asim Sarode On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा हवाला देत केला आहे. दरम्यान, मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे गटाच्यावतीने जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या जनता न्यायालयातून राहुल नार्वेकरांच्या अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावर ताशेरे ओढण्यात आले आहे. यावेळी असीम सरोदे बोलत होते.
असीम सरोदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने सूचना पाठवल्या होत्या. मात्र,राहुल नार्वेकरांकडून सूचनांचं पालन करण्यात आलेलं नाही. अपात्र आमदार प्रकरणात राहुल नार्वेकरांनी मनाला येईल तसा कायद्याचा अर्थ काढला आहे. राजकीय पक्ष हा कायमस्वरुपी असतो. पक्ष सोडल्यासं कोणत्याही पक्षात जाणं भाग असतं किंवा स्वतचा पक्ष काढून मान्यता मिळवावी लागते. सेनेतील बंडखोरांना कायद्याचं संरक्षण मिळू शकत नाही. कायद्याविरोधात प्रवृत्ती तयार होत आहेत. आम्हीच शिवसेना असं शिंदेंनी म्हणणं चुकीचं असून या प्रकरणात राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असल्याचंही सरोदे म्हणाले आहेत.
Jitendra Awhad : ‘मग, देशातील 77 टक्के लोक शेण खातात का?’ आव्हाडांचा फडणवीसांना सवाल
तत्कालीन राज्यपालांचा ‘फालतू’ असा उल्लेख
अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांवर दुख: व्यक्त केलं होतं. घटनात्मक पद असलेल्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यात सहभाग घेणं हे अत्यंत दुख:दायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचं असीम सरोदेंनी सांगितलं आहे. त्यामुळे संविधानिक पदावर बसलेला फालतू माणूस म्हणजे राज्यपाल अशी जहरी टीकाही असीम सरोदे यांनी केली आहे.
महायुतीचा आवाज जिल्ह्यानंतर सहा विभागांमध्येही घुमणार! प्रसाद लाड यांनी सांगितला मास्टर प्लॅन
अपात्र आमदार प्रकरण दहाव्या परिशिष्टानूसारच…
सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदारांप्रकरणी सुनावणी झाली. ही संपूर्ण सुनावणी ही घटनेतील दहाव्या परिशिष्टानूसारच झाली. मात्र, ही केस दहाव्या परिशिष्टानूसार नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सांगण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटाचे आमदार नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत.
गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीरच…
सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्टानूसार भरत गोगावले यांची व्हिप म्हणून करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं नमूद केलं होतं. कारण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सहीनेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच होते. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गोगोवलेंची नियुक्ती वैध ठरवली असल्याने त्यांनी विश्वासघात केल्याचं सरोदे म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निकाल सोपवल्यानंतर दीड महिन्यांनंतर राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाची घटना तपासण्यासाठी घटना मागवून घेतली. कदाचित आम्ही काय बोलणार आणि तुम्ही काय बोलायंच हे त्यांच्यात आधीच ठरलेलं असावं, अशी शंकाही असीम सरोदेंनी व्यक्त केली आहे.